News

नेमकी शिवसेना कोणाची हा वाद चांगलाच पेटताना दिसत आहे. धनुष्यबाण कोणाचा, पक्ष कोणाचा याबद्दल उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांचाही लढा सुरू असतानाच आता शिंदेंनी थेट पक्षाध्यक्षपदावरच दावा सांगितल्याची माहिती समोर येत आहे. प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख करण्यात आला आहे.

Updated on 07 October, 2022 12:49 PM IST

नेमकी शिवसेना कोणाची हा वाद चांगलाच पेटताना दिसत आहे. धनुष्यबाण कोणाचा, पक्ष कोणाचा याबद्दल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोघांचाही लढा सुरू असतानाच आता शिंदेंनी थेट पक्षाध्यक्षपदावरच दावा सांगितल्याची माहिती समोर येत आहे. प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यात शिवसेना पक्षाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हानंतर शिंदे यांनी पक्षाध्यक्षपदावरही दावा केला आहे.

मोठी बातमी! शिवेसनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर

40 आमदार (MLA) आणि 12 खासदारांसह (MP) अनेक प्राथमिक सदस्य त्यांच्यासोबत असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. शिवसेना आज कोणाच्या पक्षाचे चिन्ह आहे? ठाकरे की शिंदे यांच्याबाबत निवडणूक आयोग आज सुनावणी होणा होती. मात्र ही सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठी वाढ, आता वाढणार हे 4 भत्ते

शिवसेनेला पुरावे सादर करण्याची आज शेवटची तारीख असल्याने शिवसेना आज केवळ पुरावे सादर करणार आहे. त्यामुळे आज ही सुनावणी होणार नाही. दरम्यान, धनुष्यबाण आमच्याकडे द्या, अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

English Summary: Chief Minister Eknath Shinde's claim on the post of party president
Published on: 07 October 2022, 12:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)