शिर्डीतील या देशातील सर्वात मोठ्या तीन दिवसीय पशुधन एक्स्पोला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळला. हरियाणा राज्यातील मुऱ्हा जातीचा रेडा या एक्स्पोचा विशेष आकर्षक ठरला. याला बघण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
साईंच्या शिर्डी नगरीत देशातील सर्वात मोठ्या असणाऱ्या तीन दिवसीय महापशुधन एक्स्पोचा समारोप रविवारी (26 मार्च) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी एक्स्पोमध्ये आलेल्या हरियाणा राज्यातील 12 कोटींच्या रेड्याला पाहण्याचा मोह मुख्यमंत्र्यांना सुद्धा आवरला नाही. साधारण बारा कोटी रुपये किंमत असलेल्या या रेड्यापासून जन्मलेल्या म्हैस पंचवीस लीटर दूध देतात.
जरबेरा फुलशेतीत भरघोस कमाई, शेतकऱ्यांचे नशीब बदलणार!
भाषण संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेडा पाहण्यास पसंती दिली. इंदर नावाचा हा काळा कुळकुळीत रंग, लांब आणि भक्कम शरीर बांधा असा दिसणारा हा रुबाबदार रेडा पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली.
राज्यात कोरोना प्रकाराची सर्वाधिक रुग्ण, काळजी घेण्याचे आवाहन
शिर्डीतील या देशातील सर्वात मोठ्या तीन दिवसीय पशुधन एक्स्पोला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळला. यामध्ये शेतकऱ्यांना अनेक गोष्टी बघायला मिळाल्या आहेत. याचा शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होईल.
कारल्याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला भाव, शेतकऱ्याला मिळताहेत लाखो रुपये..
राज्यात गहू काढणीला वेग, पेरणीपासून ते काढणीपर्यंतचा कष्टमय प्रवास...
शेतकऱ्यांनो वाळवी कीटकापासून घ्यावयाची काळजी
Published on: 27 March 2023, 11:24 IST