शेतकरी रासायनिक खतांचा वापर पिकांच्या उत्पादनवाढीसाठी करतात.परंतु बऱ्याचदा ऐन पिकांना खत देण्याच्या वेळेसच खताची टंचाई निर्माण होते व जे काही खते मिळतात ते वाढीव किमतीने शेतकऱ्यांना घ्यावे लागतात असे देखील प्रकार घडतात.
शेवटी शेतकऱ्यांना नाईलाजाने वाढीव दराने का होईना शेतीसाठी खते खरेदी करावी लागतात. परंतु यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरया वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत रासायनिक खत कंपन्यांनी खतांचे विक्री दर निश्चित केले आहेत. जर या विक्री दरानुसार विचार केला तर युरिया गोणी 266.50 रुपये तर सगळ्यात जास्त वापरले जाणारे डीएपी ची एक गोणी 1350 रुपये ला संयुक्त खते 1400 ते 1900 रुपये प्रति 50 किलो एक गोणी याप्रमाणे शेतकऱ्यांना घ्यावे लागणार आहेत. खताच्या गोणी वर जी काही किंमत असेल त्याव्यतिरिक्त जास्तीची किंमत शेतकऱ्यांनी देऊ नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे
या किमतीच्या व्यतिरिक्त जर जास्त भावानेकोणी विक्रेता खतांची विक्री करत असेल तरत्यासंबंधीची माहिती कृषी विभागाचे कर्मचारी तसेचजवळच्या कृषी कार्यालयाला द्यावी,असे आवाहन कृषि विकास अधिकारी कार्यालयाने केले आहे.
ग्रेडनुसार विविध खतांच्या किमती
1-10:26:26- चे एक गोणी 1470 रुपयाला मिळेल.
2-12:32:16- ची एक गोणी 1470 रुपयाला मिळेल.
3-24:24:0- हे खत एक हजार नऊशे रुपयाला मिळेल.
4-8:21:21- हे खत1850 रुपये ला एक गोणी मिळेल.
5-9:24:24-हे खत एक हजार नऊशे रुपयाला मिळेल.
6-16:20:00:13- हे खात 1400 ते 1470 रुपयांना मिळेल.
7-15:15:0:09-या खताची गोणी 1470 रुपयाला मिळेल.
8-16:16:16- एकच 1470 रुपये रुपयाला मिळेल.
9-20:20:0- हे खात 1400 ते 1470 रुपयांना मिळेल.
10- युरिया- युरियाची 50 किलोची बॅग 266.50 रुपयांना मिळेल.(स्रोत-अग्रोवन)
महत्वाच्या बातम्या
Published on: 17 May 2022, 09:44 IST