भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव उद्या इस्लामपूरममध्ये शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी आयोजित केलेल्या शेतकरी परिषद आणि सन्मान सोहळ्यासाठी चंद्रशेखर राव सांगली दौऱ्यावर येत आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
आठ दिवासांपूर्वी म्हणजेच 1 ऑगस्टलाच ते इस्लामपूर, वाटेगावमध्ये आले होते. त्यानंतर ते उद्या पुन्हा सांगलीत येत आहेत. आठवड्याभरातला हा दुसरा दौऱा असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, या मेळाव्यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्याला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर येथील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका एकरात मिळणार 60 लाखांचे उत्पन्न, अशा प्रकारे या फळाची लागवड
दुपारी 1 ते 3 यावेळेत हा मेळावा होणार आहे. यावेळी राज्यातील शेतकऱ्याकडून के. चंद्रशेखरराव यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अवघ्या नवव्या दिवशी पुन्हा एकदा दौरा काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यातच रघुनाथदादा पाटील यांनी ९ ऑगस्टला शेतकरी शेतकरी परिषद आणि सन्मान कार्यक्रमाची घोषणा केली होती. या कार्यक्रमानिमित्तच चंद्रशेखर राव पुन्हा एकदा सांगली दौऱ्यावर आहेत.
मोठी बातमी! शेततळे गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश..
मुख्यमंत्री राव यांच्या सांगली दौऱ्याचीही त्यांनी घोषणाही केली आहे. उद्या दुपारी १ ते ३ या कालावधीत हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रघुनाथ दादा पाटील आणि के. चंद्रशेखरराव बोलणार आहेत, यामुळे काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता सातबारा उताऱ्यावर आता महिलेचेही नाव, लक्ष्मी योजनेची झाली सुरुवात...
गोकुळकडून जनावरांच्या लम्पी आजाराकडे, गोकुळचे चेअरमन, संचालकांना दौरा सोडून जाण्याची वेळ..
Published on: 08 August 2023, 02:55 IST