सध्या राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट देखील होत असल्याने फळबागा उध्वस्त होत आहेत. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची हालचाल सुरू झाली आहे.
6 मे पासून राज्यात सक्रिय होत आहे. त्यामुळे पुणे शहरावरही दुपारनंतर ढगांची गर्दी झाली. शहरात गार वारे वाहत आहे. तसेच पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शहरावर असलेल्या ढगांच्या गर्दीमुळे तापमानात दोन अंशांनी घट झाली.
यामुळे कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वी पाऊस पडल्याने गारवा निर्माण झाला आहे. कमाल तापमान 36 वरून 34 अंशांपर्यंत खाली आले आहे. आर्द्रताही 60 टक्यांवर गेल्याने गारठा अधिकच वाढला आहे.
दूध धंद्यात परवडत नाही बोलणारांसाठी ही बातमी! पठ्ठ्याने चार एकर जमीन घेतलीय..
दरम्यान, पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार आगामी पाच दिवस शहरात पावसाची शक्यता आहे. यामुळे बाहेर पडताना अंदाज घेऊन पडावे. 9 मेपर्यंत सायंकाळी हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऊस क्षेत्रात 70 हजार हेक्टरने वाढ, पुणे विभागात मोठी आघाडी..
तसेच राज्यात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यात देखील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
कारखान्यांच्या साखर विक्री दरात दोनशे रुपयांनी वाढ, कारखान्यांना दिलासा...
रोहित पवार यांना धक्का! बारामती ॲग्रोबाबत मोठी बातमी आली समोर...
गुलाब शेती ठरली फायद्याची! केवळ 10 गुंठ्यांत लाखोंची कमाई..
Published on: 05 May 2023, 11:16 IST