News

Central Government: MSP कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं दिल्लीतील पंजाब खोर या गावामध्ये देशातील 200 हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या होत्या. पंजाब खोरमध्ये MSP गॅरंटी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आले आहे.

Updated on 07 October, 2022 6:03 PM IST

Central Government: MSP कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं दिल्लीतील पंजाब खोर या गावामध्ये देशातील 200 हून अधिक शेतकरी संघटना एकत्र आल्या होत्या. पंजाब खोरमध्ये MSP गॅरंटी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवून शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे. संपुर्ण देशातील शेतकरी ही लूट थांबवण्यासाठी संघटित झालेला आहे.

यामुळं याआधी संसद मार्ग आणि जंतर मंतरवर सुरु झालेली ही लढाई आता शेतकऱ्यांच्या थेट बांधावर आणलेली असून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत तसेच गुजरातपासून आसामपर्यंतचा शेतकरी या लढाईत समाविष्ट झाला असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

हमीभाव कायद्यासाठी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक; अधिवेशनाला सुरुवात

शेतकरी न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढत असताना केंद्र सरकारकडून देशातील शेतकरी चळवळीला बदनाम करुन फूट पाडत असल्याचा आरोप सिंह यांनी केला. सर्वच राजकीय पक्षांनी या मागणीची दखल घ्यावी, अन्यथा शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा देखील सिंह यांनी दिला आहे.

या अधिवेशनाला दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, जम्मू काश्मीर, हरियाणा, पंजाब, आसाम, मेघालय, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मणिपूर, तामिळनाडू, केरळ, तेलंगणा, गुजरात आणि राजस्थान या राज्यातील शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी उपपस्थित होते.

देशात जोपर्यंत किमान हमीभाव कायदा लागू होत नाही, तोपर्यंत शेतकरी आर्थिक संकटात : राजू शेट्टी

देशाला अन्न धान्याच्या उत्पादनाच्या बाबतीत आत्मनिर्भर करत असताना शेतकरी मात्र देशोधडीला लागत आहे. देशातील 80 टक्के शेतकरी हे अल्पभुधारक आहेत.

त्यामुळं किमान हमीभावाचा कायदा लागू करावा अशी भूमिका शेट्टींनी मांडली. दिल्लीतील पंजाब खोर इथे आयोजित करण्यात आलेल्या MSP गॅरंटी किसान मोर्चाच्या अधिवेशनात राजू शेट्टी बोलत होते.

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आखली रणनीती; आता...

English Summary: central government is looting farmers by implementing anti-farmer policies
Published on: 07 October 2022, 06:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)