News

शेतकरी मोठ्या कष्टाने शेतामध्ये शेतीमाल पिकवतात. परंतु बाजारभाव योग्य न मिळाल्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडतात.

Updated on 06 June, 2022 1:08 PM IST

 शेतकरी मोठ्या कष्टाने शेतामध्ये शेतीमाल पिकवतात. परंतु बाजारभाव योग्य न मिळाल्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे  शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडतात.

या समस्येवर उपाय म्हणून शासनाकडून काही पिकांसाठी किमान आधारभूत किंमत अर्थात एम एस पी जाहीर केली जाते. यामुळे कमीत कमी खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांना एम एस पी च्यादरापेक्षा कमी भावात शेतमाल खरेदी करता येत नाही.

त्यामुळे काही अंशी का असेना किमान आधारभूत किंमत मुळे शेतकऱ्यांना थोडाफार तरी दिलासा मिळतो. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर आता एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मिळालेल्या वृत्तानुसार सरकार लवकरच 2022-23 मध्ये खरीप पिकांसाठी एमएसपीत पाच ते 20 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शक्यता आहे.

शेती करण्यासाठी लागणाऱ्या खर्चात वाढ झाल्यामुळे तसेच कृषी यंत्रांच्या किमतींमध्ये भरमसाठ झालेली वाढ या पार्श्वभूमीवर सरकारने या निर्णयाचा विचार करत आहे.जर सरकारने हा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

नक्की वाचा:टरबूज शेती: टरबूज लागवड करतात तर त्यावर प्रक्रिया करून 'हे'पदार्थ बनवले आणि विकले तर मिळवाल बंपर नफा

एकंदरीत एमएसपीची सद्यस्थिती

 एम एस पी मध्ये सन 2018-19 या वर्षानंतर उत्पादन करता मध्ये झालेला सर्वाधिक उत्पादन खर्च लक्षात घेऊन 50 टक्के नफा हे नवीन धोरण तयार करण्यात आले.

या नवीन धोरणामुळे खरीप पिकांसाठी असलेली एम एस पी 4.1 टक्क्यांवरून 28.1टक्के करण्यात आली.जर यामध्ये मीडिया रिपोर्टचा विचार केला तर,गेल्या तीन वर्षांमध्येसरकारने किमान आधारभूत किमतीमध्ये अंदाजे एक ते पाच टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

जर आपण फायनान्शिअल एक्सप्रेसच्या अहवालाचा विचार केला तर, कृषी खर्च आणि किंमत आयोगाने या वर्षी सोयाबीन तसेच भुईमूग आणि तत्सम तेल बियांसाठी असलेल्या किमान आधारभूत किमतीमध्ये सर्वाधिक वाढ करण्याची शिफारस केली आहे. यासोबतच तूर आणि मूग या कडधान्ये वर्गीय पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:अगदी 5 ते 10 हजार रुपयांमध्ये हँडवॉश व्यवसाय सुरू करा अन मिळवा प्रतिमहिना 25 ते 30 हजार

 किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ झाल्यास होईल हा फायदा

 जर सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ केली तर जवळजवळ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढेल. 

शेतकऱ्यांच्या शेतमालाला जी किमान आधारभूत किंमत दिली जाते यामध्ये पिकांवर शेतकऱ्यांनी केलेल्या उत्पादन खर्चसमाविष्ट असेल.

यामध्ये शेतकऱ्यांनी विकत घेतलेले खते, बियाणे,  कीटकनाशके खरेदी चा देखील खर्च यामध्ये समाविष्ट असतो तसेच शेतीसाठी लागणारे अवजारांचा इंधन खर्च तसेच जमीन जर भाडेतत्त्वावर घेतली असेल तर त्या जमिनीची किंमत आणि मजूर यांचादेखील समावेश यामध्ये असेल.

नक्की वाचा:महत्वाचे! तुम्ही खरेदी केलेल्या औषध खरे आहे की बनावट अगदी ओळखता येईल 15 सेकंदात

English Summary: central government can growth in minimum sopport price in kharip season 2022
Published on: 06 June 2022, 01:08 IST