गेल्या काही दिवसांपासून शेतीमध्ये अनेक बदल होत आहेत. यामुळे शेतकरी आधुनिक शेती करू लागले आहेत. कोविड संकटाच्या काळातही कृषी क्षेत्राने स्वत:ला सकारात्मकरित्या सिद्ध केले आहे. यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन काहीसा बदलू लागला आहे.
असे असताना आता सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट जोधपूर येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 1 लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीची माहिती दिली. कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्याबरोबरच त्यांच्या वाजवी किंमतीसाठी मोदी सरकारने अनेक पावले उचलली आहेत.
यामध्ये कृषी क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी एक लाख कोटी रुपये दिले आहेत. त्यापैकी 14 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. कृषी क्षेत्राच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे आहे.
राज्यातील देवस्थान बोर्डाच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावे कधी होणार? शेतकरी आक्रमक
आता त्यांनी उत्पादकता वाढवण्यावर भर देण्याची गरज आहे. लागवड साहित्याची उपलब्धता वाढविण्यावर भर देत कजरी या बाबतीत पुढे गेल्यास केंद्र सरकार आपल्या स्तरावर पूर्ण सहकार्य करेल, असे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे.
मोठी बातमी! शेतकरी नेते पाशा पटेलांना पुत्र शोक, हसन पटेल यांचे निधन..
भारत लवकरच बहुतांश कृषी उत्पादनांमध्ये प्रथम क्रमांकावर येईल. सध्या, बहुतेक कृषी उत्पादनांच्या बाबतीत भारत जगात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे. लवकरच भारत सर्वच क्षेत्रात पुढे जाणार आहे, असेही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
हवामानात मोठा बदल! आजपासून 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात, पंजाबराव डख यांची माहिती..
बारामती ॲग्रोच्या अडचणी वाढण्याची शक्यता, तानाजी सावंत यांनी भरले कारखान्याचे 9 कोटी...
1 सप्टेंबरपासून दुधाचे दर 7 रुपयांनी वाढणार, जाणून घ्या काय असणार दर..
Published on: 29 August 2022, 03:15 IST