भारताचे सगळे सौंदर्य त्याच्या खेड्यांमध्ये लपले आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागाचा जर शाश्वत विकास झाला तर पर्यायाने देशाचा विकास होणार हे जवळजवळ सूत्रच आहे. देशातील बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात राहते व या ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकसंख्येचा प्रमुख व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे.
त्यामुळे विविधांगांनी ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करणे हे फार महत्त्वाचे आहे. हाच दृष्टीकोन समोर ठेवून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास व्हावा यासाठी केंद्र सरकारने नऊ कलमी कार्यक्रम राबविण्याचे धोरण निश्चित केले आहे आणि चालू आर्थिक वर्षापासून सर्व राज्यांनी त्याची अंमलबजावणी करावी अशा प्रकारच्या सूचना केंद्राने दिले आहेत. यासंबंधी विचार केला तर संयुक्त राष्ट्राने यासंबंधी सतरा ध्येय निश्चित केले आहेत. यापैकी भारताने नऊ उद्दिष्टांची निवड केली असून याच्या आधारे येणाऱ्या 2030 वर्षापर्यंत खेड्यांचा शाश्वत विकास करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निश्चित केले आहे. हीध्येय निश्चिती राष्ट्रीय ग्रामस्वराज्य मोहिमेअंतर्गत केली जाणार आहे. त्यासाठी या मोहिमेत काही सुधारणा देखील करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर या चालू आर्थिक वर्षापासून पंचायतराज यंत्रणेच्या माध्यमातून याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट आहे. कारण पंचायत राज हा ग्रामीण भागाचा आरसा आहे असे म्हटले जाते.
यासंबंधीसंयुक्त महाराष्ट्राने जगातून गरीबीचे पूर्णपणे उच्चाटन व्हावे तसेच प्रजेचे रक्षण करणे आणि 2030 पर्यंत जगातील सर्व लोकसंख्येला शांतता व समृद्धी प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने 2015 मध्ये 17 ध्येय निश्चित केली होती. त्यापैकी नऊ ध्येय भारताने निवडले आहेत. 24 एप्रिल हा दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने हा नऊ कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. केंद्र सरकारने जे नऊ ध्येय निवडले आहेत त्यापैकी कुठल्याही एका संकल्पनेवर प्रत्येक गावाला काम करणे अनिवार्य केले आहे. या नऊ ध्येयच्या आधारे खेड्यांचा शाश्वत विकास करण्याचा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांना दिला आहे.
हे आहेत ती 9 उद्दिष्टे
1- आरोग्यदायी गाव
2- बालस्नेही गाव
3- जलसमृद्ध गाव
4- स्वच्छ आणि हरित गाव
5- पायाभूत सुविधा युक्त स्वयंपूर्ण गाव
6- सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव
7- सुशासन युक्त गाव
8- लिंग समभाव पोषक गाव
9- गरीब मुक्त गाव
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:उकाडा वाढणार! या आठवड्यामध्ये पुन्हा येणार उष्णतेची लाट, एप्रिल महिना ही तापणार
नक्की वाचा:बेरोजगारांसाठी आशेचा किरण घेऊन येत आहे सरकारचा हा उपक्रम, ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात
Published on: 24 April 2022, 10:46 IST