News

देशामध्ये बेरोजगारी तसेच महागाई या दोन प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केले असून यामधून सर्वांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसून येत आहे.

Updated on 14 June, 2022 9:41 PM IST

देशामध्ये बेरोजगारी तसेच महागाई या दोन प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केले असून यामधून सर्वांची सुटका करण्यासाठी केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातील मानव संसाधन स्थितीचा आढावा घेतला व या दरम्यान पुढील वर्षात मिशन मोड मध्ये 10 लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी अशा सूचना देखील त्यांनी सर्व विभाग व मंत्रालय यांना दिले आहेत.

यासंबंधीची माहिती पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओ च्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकृतरीत्या देण्यात आली आहे. सध्या भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने देशभरात महागाई आणि बेरोजगारी वरून  मोठा मोर्चा उघडला असून प्रचंड प्रमाणात टीका केली जात आहे.

तसेच काँग्रेस खासदार राहुल गांधी हे देखील बेरोजगारीच्या प्रश्नावरून सरकारला घेरत असून या सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी हा घेतलेला निर्णय महत्त्वाचा समजला जात आहे

नक्की वाचा:तरुणांनो नोकरीत पैसे मिळत नसतील तर सुरु करा ॅग्रीकल्चर स्टार्टअप, सरकार देणार २५ लाख रुपये

बेरोजगारांना मिळू शकतो दिलासा

 पंतप्रधान मोदी यांनी मंत्रालयातील सर्व विभाग आणि मंत्रालयातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील दीड वर्षातच भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे भारतातील जवळजवळ दहा लाख बेरोजगारांना रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध होईल यात शंका नाही.

 या घोषणेवर काँग्रेसची टीका

 पंतप्रधान कार्यालय अर्थात पीएमओ कडून करण्यात आलेल्या घोषणेवर काँग्रेस पक्षाने टीका केली असून अगोदरच भाजपने दरवर्षी दोन कोटी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. म्हणजेच आठ वर्षात सोळा कोटी नोकऱ्या देणार होते परंतु आता 2024 पर्यंत फक्त दहा लाख नोकऱ्या देणार असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या देशात 60  लाख पदे रिक्त आहेत तर तीस लाख केंद्रातील पदे रिक्त आहेत.  अशा प्रकारची घोषणाबाजी कधीपर्यंत करणार? असा देखील महत्त्वाचा प्रश्न कॉंग्रेसचे नेते रणजित सिंग सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.

नक्की वाचा:MKCL Recruitment:'या' पदासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मध्ये मोठी भरती, प्रक्रियेला सुरुवात

नक्की वाचा:Police Recruitment: मोठी बातमी! राज्यात लवकरच भरली जाणार 7 हजार पदे; पोलीस भरतीची तारीख जाहीर

English Summary: central goverment create 2 lakh job in will be coming 2 year declare pm
Published on: 14 June 2022, 09:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)