News

तसं बघायला गेलं तर शेती व्यवसाय करणे जोखमीचं काम. प्रचंड मेहनत, पूर्वनियोजन सगळं काही केलं तरी कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे शेतकरी बंधूना नुकसानीला सामोरे जावेच लागते. त्यामुळे कितीतरी लोक शेती व्यवसाय नको रे बाबा अशी भावना व्यक्त करत असतात.

Updated on 19 June, 2022 12:50 PM IST

तसं बघायला गेलं तर शेती व्यवसाय करणे जोखमीचं काम. प्रचंड मेहनत, पूर्वनियोजन सगळं काही केलं तरी कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे शेतकरी बंधूना नुकसानीला सामोरे जावेच लागते. त्यामुळे कितीतरी लोक शेती व्यवसाय नको रे बाबा अशी भावना व्यक्त करत असतात. दरम्यान कैलास पतंगे नामक शेतकऱ्याने शेती परवडत नाही म्हणून शेती व्यवसाय सोडून दुसरा व्यवसाय सुरु करण्यासाठी पठ्ठ्याने थेट बॅंकेकडून तब्ब्ल 6 कोटी 65 लाखाचे कर्ज मागितले होते.

सेनगाव तालुक्यातील या शेतकऱ्याला हेलिकॉप्टर व्यवसाय सुरु करायचा होता म्हणून एवढ्या रकमेचे कर्ज त्याने मागितले होते. आता हा विषय चर्चेत असतानाच अजून एका अल्पभूधारक शेतकऱ्याची चर्चा राज्यभर होत आहे. बुलडाण्यातील शुभंम इंगळे हा शेतकरी त्याच्या अनोख्या मागणीमुळे चर्चेत आला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेत पिकांचे बरेच नुकसान होत आहे.

शिवाय आर्थिक नुकसान होते ते वेगळेच त्यामुळे शेती व्यवसाय परवडत नसल्याने चांगेफळच्या पठ्ठ्याने थेट बॅंक ऑफ इंडियाकडे 5 कोटी 50 लाखाच्या कर्जाची मागणी केली आहे. राजकीय घडामोडीमुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सला फार महत्व आले आहे या दृष्टिकोनातून फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्यासाठी शेतकरी शुभम ने बँकेकडे इतक्या रकमेची मागणी केली आहे.

Happy Father's Day : बाप बाप असतो, त्याच्या पेक्षा मोठा देव पण नसतो..!!

कर्ज मिळावे यासाठी अनेक वेळा बॅंकेचे उंबरठे झिजवले. या दोन प्रसंगातून सध्या शेतकरी शेती व्यवसायातील होणाऱ्या नुकसानीला कंटाळले असून इतर व्यवसायात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

फाईव्ह स्टार हॉटेलची उभारणी कशासाठी?
राजकीय घडामोडीमुळे पंचतारांकित हॉटेल चर्चेत आले आहेत. दरम्यान राज्यसभा निवडणुका पार पडल्या. त्यावेळी राज्यातील आमदारांचा मुक्काम हा पंचतारांकित हॉटेलमध्ये होता. नेत्यांचा मुक्काम अशा अलिशान हॉटेल्समध्ये होत आहे. तर दुसरीकडे मात्र शेती व्यवसायातून नीट कमाईदेखील होत नाही. त्यात आपत्कालीन संकटांचा प्रश्न वेगळाच. त्यामुळे बुलाडाणा जिल्ह्याातील शुभंम इंगळेने फाईव्ह स्टार हॉटेल उभारण्याचे ठरवले आहे.

शेतकरी शुभंम इंगळे
शेतकरी शुभंम इंगळे हे बुलडाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ गावातील रहिवासी आहे. गेली कित्येक वर्षे शेतात अमाप कष्ट घेऊनही हवे तसे उत्पादन मिळाले नाही. त्यामुळे शेती व्यवसाय तोट्याचा आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळेच शेती व्यवसाय सोडून हॉटेल उभारण्याचा त्याचा निर्धार आहे. आता त्या कर्जाचे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे शेतकरी शुभंम इंगळे याना हे फाईव्ह स्टार हॉटेल
जिल्ह्यातच उभे करायचे आहे.

महत्वाच्या बातम्या:
मनसे पदाधिकार्‍यांचे अनोखे आंदोलन; शेणखताची बॅग देऊन...
'एक दिवस बळीराजासोबत'

English Summary: cannot afford agriculture; Farmers demand crores of rupees for 'Five Star Hotel'
Published on: 19 June 2022, 12:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)