News

शेतकऱ्याचा जन्मच मुळी समस्यांचा सामना करण्यासाठी झाला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्याला माहित आहेच की यावर्षीअतिरिक्त उसाचा प्रश्न हा गंभीर स्वरूपात उभा ठाकला आहे.

Updated on 02 April, 2022 8:26 AM IST

शेतकऱ्याचा जन्मच मुळी समस्यांचा सामना करण्यासाठी झाला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्याला माहित आहेच की यावर्षीअतिरिक्त उसाचा प्रश्न हा गंभीर स्वरूपात उभा ठाकला आहे.

. मराठवाड्यातील बरेच जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यात अजूनही अतिरिक्त ऊस गाळपाचा मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. बरेच कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने ऊसतोड करण्यासाठी शेतकरी धावपळ करताना दिसत आहे. परंतु शेतकर्‍यांच्या या असहायतेचा फायदा भलत्याच  पद्धतीने घेतला जात असल्याचे सध्याचे चित्र आहे. कारखान्यांच्या ऊस तोड करणाऱ्या टोळ्यांकडूनऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूटमार होत असल्याच्या तक्रारी मध्ये वाढ होत आहे.एकर ऊस तोडण्यासाठी ऊसतोड टोळ्यांकडून 10 ते 12 हजार रुपयांची मागणी केली जात आहे तसेच सोबत मटण व दारूची देखील मागणी होत आहे.

नक्की वाचा:पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी उपयुक्त आहे प्रिसिजन फार्मिंग; जाणून घेऊ त्याचे फायदे

याबाबत कारखान्यांनी हात झटकले असून, ऊसतोड कामगारांच्या या मागण्या पूर्ण करता करता शेतकऱ्याच्या नाकीनऊ आले आहेत. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने उसाच्या लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली होती. परंतु उसाचे क्षेत्र अति प्रमाणात वाढल्याने गाळप करण्यास उशीर लागत आहे.

त्यामुळे उसाला तुरे येत असून वजनामध्ये गट होण्याचा धोका आहे त्यामुळे शेतकरीशेतातील ऊस तुटावा म्हणून धडपड करत आहे. याचाच फायदा ऊसतोडणी करणाऱ्या टोळ्या घेत आहेत.

 राज्यातील ऊस गाळपाचे स्थिती

 यावर्षी ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबर 2021 ला सुरू झाला होता. तेव्हापासून तर आतापर्यंत भरपूर प्रमाणात उसाचे गाळप करण्यात आले आहे. परंतु अजूनही अनेक ठिकाणी ऊस गाळपाचा प्रश्‍न शिल्लक आहे. त्यामुळे शेतातील पडलेला ऊस गाळप होतो की नाही याची चिंता शेतकऱ्यांनाआहे.

नक्की वाचा:1 एप्रिल म्हणजे नवीन आर्थिक वर्ष आजपासून सुरू; कोणत्या गोष्टीत होणार बदल तर ग्राहकांच्या खिशाला बसेल महागाईची झळ

काही तांत्रिक कारणामुळे काही कारखाने बंद आहेत त्यामुळे गाळपाचा प्रश्‍न अधिकच तीव्रतेने जाणवत आहे. साखर कारखान्यांना गाळप बंद करण्यापूर्वी साखर कारखान्यांच्या संचालकांना साखर आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे. अशा स्वरूपाचा पत्रव्यवहार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनीकारखाना व्यवस्थापनाशीकेलेला आहे. कारखाना क्षेत्रातील उसाचे गाळप शिल्लक राहणार नाही याची खबरदारीव जबाबदारी ही कारखान्यांचे जाणार असल्याचे देखील सांगितले आहे.(स्रोत-एबीपी माझा)

English Summary: cane crop cutting labour demand to 10 to 12 thousand ruppes per acre from farmer
Published on: 02 April 2022, 08:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)