News

मंचर परिसरातील टाव्हरेवाडी या फिडरद्वारे भारनियमन करण्यात आले आहे. गुरुवार रात्रीपासून हे भारनियमन सुरु झाले असून त्याविरोधात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्यासह वीज बिल न भरण्याचा इशारा महावितरणला दिला आहे. याबाबत परिसरातील तीन गावांच्या ग्रामस्थांनी महावितरणला निवेदन दिले आहे.

Updated on 11 April, 2022 10:43 AM IST

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात रात्रीच्यावेळी ३ ते ४ तास भारनियमन सुरु केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. मंचर परिसरातील टाव्हरेवाडी या फिडरद्वारे भारनियमन करण्यात आले आहे. गुरुवार रात्रीपासून हे भारनियमन सुरु झाले असून त्याविरोधात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्यासह वीज बिल न भरण्याचा इशारा महावितरणला दिला आहे.

याबाबत परिसरातील तीन गावांच्या ग्रामस्थांनी महावितरणला निवेदन दिले आहे. तसेच याबाबतचे निवेदन राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना मेलद्वारे पाठविण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. तालुक्यात अवसरी हे गाव अधिक लोकसंख्या असलेले असून या ठिकाणी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे.

रात्रीच्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या परिसरातील अनेक गावातील लोक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ये-जा करतात. अशा परिसस्थितीत हे भारनियमन अयोग्य असल्याची भुमीका मांडत शेतकरी आक्रमक झाले आहेत. जुन्नर तालुक्यासह आंबेगाव तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे. परिसरात शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात कामानिमित्त ये-जा करावी लागते. त्यामुळे रात्रीच्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

शिवाय संबंधित गावाच्या ग्रामस्थांकडून नियमित बिल भरणा करून देखील भारनियमन होऊ लागल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. तर गावडेवाडी, अवसरी आई तांबडेमळा या गावच्या सरपंचानी देखील महावितरणने त्वरित भारनियमन मागे घेण्याची मागणी केली आहे. यामुळे आता हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

महत्वाच्या बातम्या;
अजित पवारांनी निर्णय घेतला आणि यंत्रणा लागली कामाला, अतिरिक्त ऊस तोडायला हार्वेस्टर रवाना..
चालत्या-फिरत्या पेट्रोल पंपामुळे शेतकऱ्यांना फायदा, घरपोच मिळतय पेट्रोल..
आता कोंबडी पालन करण्यासाठी सरकार देतंय ५० टक्के अनुदान, 'असा' घ्या लाभ

English Summary: Cancel night load shedding, warning farmers not to pay their electricity bills
Published on: 11 April 2022, 10:43 IST