News

मागच्या वर्षी आपण पाहिले की सोयाबीनला कधी नव्हे एवढे दर मिळाले होते. त्यामागे खाद्यतेलाची वाढलेले दर, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनात झालेली घट इत्यादी कारणे कारणीभूत होती. सोयाबीनच्या दरावर आयात आणि निर्यातीचा देखील तितकाच प्रभाव पडत असतो. जर आपण या वर्षीचा विचार केला तर यावर्षी देखील सोयाबीनची लागवड बऱ्या प्रमाणात झाली असून अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीन खराब झाले आहे.

Updated on 27 September, 2022 12:20 PM IST

मागच्या वर्षी आपण पाहिले की सोयाबीनला कधी नव्हे एवढे दर मिळाले होते. त्यामागे खाद्यतेलाची वाढलेले दर, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादनात झालेली घट इत्यादी कारणे कारणीभूत होती. सोयाबीनच्या दरावर आयात आणि निर्यातीचा देखील तितकाच प्रभाव पडत असतो. जर आपण या वर्षीचा विचार केला तर यावर्षी देखील सोयाबीनची लागवड बऱ्या प्रमाणात झाली असून अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी सोयाबीन खराब झाले आहे.

नक्की वाचा:सोयाबीनचे उत्पादन यंदा घटणार? बघा सविस्तर

परंतु असे असतानादेखील बाजारामध्ये नवीन सोयाबीनची आवक लवकर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह जे काही साठवणूकदार आहेत त्यांनी त्यांच्याकडील जो काही शिल्लक साठा होता तो विक्रीसाठी काढला आहे.

या परिस्थितीचा परिणाम हा सोयाबीनचे दर जास्तीत जास्त पाच हजार रुपयांवर स्थिर राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. जर शिल्लक साठ्याचा विचार केला तर याबाबतीत सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या माहितीनुसार 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 27 लाख टनापेक्षा जास्तीचा साठा शिल्लक आहे याचा अंदाज आहे.

 यावर्षी सोयाबीनची देशांतर्गत परिस्थिती

आपल्याला माहिती आहेच की, भारताचा विचार केला तर महाराष्ट्र,मध्यप्रदेश राज्य तसेच राजस्थान हे प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहेत.

नक्की वाचा:कापूस दरवाढ रोखण्याचा दबाव केंद्राने झुगारला, असा राहील शेतकऱ्यांच्या कापसाला दर

आता या ठिकाणी नवीन सोयाबीनची आवक होऊ लागली असून व त्यासोबतच शिल्लक साठा या दोन्हींचा पुरवठा साठवणूक दार आणि उत्पादक शेतकरी प्रक्रिया उद्योगांना करत असून याचा परिणाम हा सोयाबीन प्रक्रिया उद्योगांना पुरवठा करणाऱ्या मालाच्या दरात 100 ते 300 रुपये प्रतिक्विंटल घट होण्यावर झाला आहे.

जर आपण मध्यप्रदेशचा विचार केला तर या ठिकाणी देखील बर्याच ठिकाणी दर 200 ते 250 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरले आहेत.

जर आपण क्विंटल च्या हिशोबाने विचार केला तर ते 5000 ते साडेपाच हजार रुपये या दराने सध्या सोयाबीनचे व्यवहार सुरू आहेत.

जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याकडे देखील प्रतिक्विंटल तीनशे रुपयांची घट झालेली आहे.त्यामुळे या सगळ्या एकंदर परिस्थितीचा विचार केला तर सोयाबीनचे दर पाच हजार रुपयापर्यंत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नक्की वाचा:Basmati Rice: अतिवृष्टीमुळे खाद्यपदार्थाच्या किमती गेल्यावर्षीपेक्षा २० टक्क्यांनी वाढल्या; बासमती तांदळाचे भाव वाढणार

English Summary: can this year soybean market rate 5000 thousand rupees per quintal
Published on: 27 September 2022, 12:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)