News

रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी जूनमध्ये होणाऱ्या पतधोरण बैठकीत रेपो दरात वाढ करण्याचे संकेत दिले असून यामुळे कर्ज अधिक महाग होऊ शकते.

Updated on 24 May, 2022 9:17 PM IST

 रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी जूनमध्ये होणाऱ्या पतधोरण बैठकीत रेपो दरात वाढ करण्याचे संकेत दिले असून यामुळे कर्ज अधिक महाग होऊ शकते.

त्यासोबतच जूनमध्ये होणाऱ्या बैठकीत रिझर्व बँक महागाईचा  एक अंदाज देखील जाहीर करेल.यासंबंधीची माहितीआरबीआयचे गव्हर्नरशक्तिकांता दास यांनी सीएनबीसी टीव्ही 18ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तसं ते बोलताना म्हणाले की महागाई हा रिझर्व बँकेचा साठी सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे.

 इतर देशातील व्याजदराची परिस्थिती

 रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी जगात काय चालले आहे याचे उदाहरण देऊन ही परिस्थिती स्पष्ट केली.त्यावेळी ते म्हणाले की रशिया आणि ब्राझील वगळता जवळजवळ जगातील प्रत्येक देशांमध्ये व्याजदर हे निगेटिव आहेत. प्रगत  अर्थव्यवस्था साठी महागाईच्या लक्ष दोन टक्के आहे.

यासंबंधी जपान आणि अन्य एक देश वगळता सर्व प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये मागणी सात टक्के पेक्षा जास्त आहे. यामध्ये निगेटिव्ह व्याजदराचा अर्थ आहे की तुम्हाला मुदत ठेवीवरील चलनवाढीच्या दरापेक्षा कमी व्याज मिळते.

महागाईने रिझर्व बँकेची सहा टक्क्यावरची मर्यादा ओलांडली

 मे महिन्यामध्ये ग्राहक किंमत निर्देशांक आधारित किरकोळ महागाई एप्रिल मध्ये 7.79 टक्क्यांवर पोहोचली तसेच खाद्यपदार्थांच्या वाढत्या तेलाच्या किमती मुळे महागाई आठ वर्षाच्या उच्चांकावर पोहोचली आहे.  मे 2014 मध्ये महागाई 8.32 होती. मे हा सलग चौथा महिना होता यामध्ये महागाई दराने आरबीआयची सहा टक्के वरचे मर्यादा ओलांडली.

फेब्रुवारी 2022 मध्ये हा दर साडेसहा टक्क्यांच्या आसपास होता तर जानेवारीमध्ये 6.01 टक्के आणि मार्चमध्ये 6.95 इतका नोंदवला गेला होता. तसेच गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की मध्यवर्ती बँक बहू वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेतील तरलतेची स्थिती सामान्य करण्याचा विचार करीत आहे.

तसेच रुपयाच्या घसरणीने बाबत त्यांनी आश्वासन दिले की केंद्रीय बँक चलन बाजारात रुपयाची अस्थिरता रोखेल.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:मोदी सरकारच्या या आठ महत्वाकांक्षी योजना माहित आहेत का?

नक्की वाचा:ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला नुकसानीचा पहिला हप्ता, शेतकऱ्यांना दिलासा

नक्की वाचा:आता शेतातली कामे होणार झटपट; मराठमोळ्या जोडप्याने तयार केले आगळे वेगळे मशीन

English Summary: can reserve bank repo rate increase in will be coming days so emi inflation
Published on: 24 May 2022, 09:17 IST