मागील बऱ्याच दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ झालेली होती. आता कुठे थोडाफार दिलासा मिळत असून यामध्ये एक बातमी समोर येते आहे ती म्हणजे सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कार्पोरेशनने या प्रकारचे संकेत दिले असून सर्वसामान्यांचे परत चिंता वाढली आहे.
जर आपण चालू आर्थिक वर्षाचा विचार केला तरी एप्रिल आणि जून या तिमाहीमध्ये पेट्रोल दहा रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 14 रुपये तोट्यासह विकले आहे.
यामुळेच आयओसीला अडीच वर्षात प्रथमच तोटा झाला आहे. देशातील सर्वात मोठे असलेल्या तेल शुद्धीकरण आणि इंधन किरकोळ विक्रेत्यांने या आर्थिक वर्षात जवळजवळ 1952.53 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला असून मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये 5941 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
एका वर्षात 78 वेळा वाढल्या किमती
जर आपण मागील एका वर्षाचा विचार केला तर या कालावधीमध्ये केंद्र सरकारने तब्बल 78 वेळा पेट्रोलच्या दरात वाढ आणि सात वेळा दर कमी केले होते तर डिझेलच्या दरात एका वर्षात 76 वेळा वाढ आणि दहा वेळा कपात करण्यात आली होती. परंतु आता मे महिन्यानंतर सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोल उत्पादन शुल्कात आठ रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्काच्या रुपयांची कपात केली होती. त्यामुळे पेट्रोल 9.5 रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे.
नक्की वाचा:खत म्हणून कोळसा आणि वाळू, बोगस कंपन्यांचा राज्यात धुमाकूळ...
सध्या कच्च्या तेलाची परिस्थिती
भारताची कच्च्या तेलाची आयात प्रती बॅरल सरासरी 109 डॉलरवर आहे. यासंबंधीच्या अहवालात म्हटले गेले आहे की,देशातील पेट्रोल पंपांवर वाहनांच्या इंधनाचे दर प्रती बॅरल 85 ते 86 डॉलरच्या किमतीनुसार निश्चित करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 2020 च्या जानेवारी- मार्चच्या पहिल्या तिमाही नंतर हा पहिलाच तोटा आहे.
नक्की वाचा:पिक्चर अभी बाकी है! उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, कारण

नक्की वाचा:पिक्चर अभी बाकी है! उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, कारण..
Published on: 01 August 2022, 09:41 IST