News

सध्या महागाई म्हटली म्हणजे गगनाला गवसणी घालताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, साखर अशा बऱ्याचशा जीवनावश्यक वस्तू प्रचंड प्रमाणात महाग झाले आहेत.

Updated on 07 April, 2022 8:37 AM IST

सध्या महागाई म्हटली म्हणजे गगनाला गवसणी घालताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, साखर अशा बऱ्याचशा जीवनावश्यक वस्तू प्रचंड प्रमाणात महाग झाले आहेत.

जर यामध्ये दुधाचा विचार केला तर मागच्या महिन्यामध्ये दुधाचे दर  वाढले होते. परंतु आता पुन्हा दुधाच्या किमती वाढतील अशा प्रकारचे संकेत अमूलने दिले आहेत. आपण मागच्या महिन्यात पाहिले होतेच की, दूध क्षेत्रातील प्रसिद्ध कंपन्या जसे की गोवर्धन, सोनाई आणि अमुल सारख्यांनी दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. आता पुन्हा दुधाचे दर वाढतील अशी शक्यता आहे.

नक्की वाचा:वावर आणि चांगले पाणी दिसले की तुम्ही कांडेच लावतात, दुसऱ्या पिकाचा देखील विचार करायला हवा-मा. शरद पवार

दूध दरवाढमागे अमुलने सांगितलेली कारणे

 अमुल कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की लॉजिस्टिक, ऊर्जा आणि पॅकेजिंग इत्यादी खर्चामध्ये वाढ होत असल्याने दुधाच्या किंमती पुन्हा वाढू शकतात.

परंतु यावेळेस प्रतिलिटर किती वाढ होईल याबाबत स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. यासंबंधी अमुल कंपनीचे एमडी आरएस सोदी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, दुधाच्या किमती कमी होणे आता दुरापास्त आहे. परंतु किमतीमध्ये वाढ निश्चित होऊ शकते. जर आपण सहकारी संघांचा विचार केला तर सहकारी संघाने गेल्या दोन वर्षांमध्ये अमुल च्या दुधात दरात आठ टक्क्यांनी वाढ केली असून गेल्या महिन्यातच प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

नक्की वाचा:सरकारला आली आठवण! 2018 मधील चारा छावण्यांच्या अनुदान वाटपाला अखेर मुहूर्त सापडला

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की कोरोना महामारी च्या कालावधीत दुधापासून शेतकऱ्यांचे उत्पन्न लिटरमागे चार रुपयांनी वाढले आहे. 

परंतु कंपन्यांचे नफा  अनेक अडचणींमुळे कमी झाला आहे. परंतु नफा वसुली हे सहकारी संस्थेचे उद्दिष्ट नसून अमुल ला मिळणाऱ्या एक रुपयांपैकी 85 पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात असे त्यांनी सांगितले.

English Summary: can milk rate growth in few datys give indication of amul milk
Published on: 07 April 2022, 08:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)