जर आपण महाराष्ट्रातील कांदा पिकांचा विचार केला तर बऱ्याच भागांमध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होते. परंतु जर आपण मागील काही दिवसांपासून कांदा दराचा विचार केला तर अगदी कवडीमोल दराने कांदा शेतकरी बंधूंना विकावा लागला. शेतकरी बंधूंचा अक्षरशा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. परंतु जर आपण सध्या परिस्थितीचा विचार केला तर मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात हळूहळू का होईना सुधारणा होताना दिसून येत आहे.
कारण मागणीच्या मानाने कांद्याचा पुरवठा फारच कमी प्रमाणात होत असल्यामुळे ही परिस्थिती दिसून येत आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये अजून कांद्याचे दर वाढतील असा तज्ञांचा अंदाज आहे.परंतु आता जरी कांद्याची दरवाढ होत आहे किंवा दिवाळीनंतर याच्यापेक्षा जास्त दर वाढतील यात शंका नाही.परंतु शेतकरी बंधूंना या कांदा दरवाढीचा फायदा मिळेल असे दिसत नाही. कारण शेतकऱ्यांकडे हवा तेवढा कांदा शिल्लक नाही.
दिवाळीनंतर कांदा दर वाढतील?
जर आपण या क्षेत्रातील तज्ञांचा विचार केला तर त्यांच्या माहितीनुसार दिवाळी नंतर कांदा बाजारभावात चांगली वाढ होईल. सध्या जर आपण किरकोळ बाजाराचा विचार केला तर चाळीस रुपये प्रतिकिलो हा कांद्याचा दर आहे.
परंतु त्यामध्ये वाढ होऊन दिवाळीनंतर कांदा पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत किरकोळ बाजारात विकला जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागच्या महिन्यामध्ये किरकोळ बाजारात कांदा 15 ते 25 रुपये प्रति किलो इतका होता.
परंतु दिवाळी नंतर 50 रुपये प्रति किलो दर किरकोळ बाजारात पाहायला मिळू शकतो. जर आपण सध्या बाजार समितीचा विचार केला तर कांदा मार्केटमध्ये अजून देखील नवीन लाल कांदा हव्या तेवढ्या प्रमाणात विक्रीसाठी येत नाहीये.
तसेच कांदा चाळीमध्ये शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने जो काही कांदा साठवून ठेवलेला होता तो देखील मोठ्या प्रमाणात खराब झाल्याने शेतकऱ्यांकडे देखील कांद्याचा एकदम नगण्य साठा सध्या शिल्लक आहे. त्यामुळे सध्या फार कमी प्रमाणात कांद्याचा पुरवठा बाजारात होत असून यामुळेच बाजारभावात वाढ होत आहे.
शेतकरी बंधूनी भाववाढीच्या अपेक्षेने जो काही कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला होता तो सडल्यामुळे शेतकरी बंधूंना फार मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे थोडाबहुत जुना कांदा शिल्लक आहे त्यांना हा बाजार भावाचा फायदा होणार आहे.
परंतु जर आपण एकंदरीत परिस्थितीचा विचार केला तर अगदी कमी प्रमाणात शेतकऱ्यांकडे सध्या कांदा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना पेक्षा व्यापारी वर्गाला जास्त होईल अशी शक्यता दिसून येत आहे.
जर आपण महाराष्ट्र सोबतच्या प्रमुख कांदा उत्पादक राज्य जसे की राजस्थान आणि मध्य प्रदेश इत्यादी राज्यांचा विचार केला तर या ठिकाणी देखील कांद्याचे उत्पादन होते.परंतु या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या कांदा हा चवीला चांगले असल्यामुळे या राज्यांच्या कांद्यापेक्षा महाराष्ट्रातील कांद्याला चांगली मागणी असते.
दिवाळी झाल्यानंतर बाजार भावात आणखी वाढ होईल यात शंकाच नाही. त्यामुळे बाजारपेठेत दिवाळीनंतर जो काही नवीन कांदा येईल त्या कांद्याला देखील चांगला बाजारभाव मिळतो का याकडे देखील शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहणार आहे.
Published on: 20 October 2022, 04:06 IST