केंद्रीय कर्मचाऱ्यांना येत्या जुलै महिन्यामध्ये चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार,एसआयसीपीआय इंडेक्समध्ये दोन महिने लागोपाठ घट झाल्यानंतर मार्च 2022 मध्ये एक पॉईंट ची वाढ झाली आहे.
.हेच कारण महागाई भत्ता वाढ होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. महागाई भत्ता मध्ये पुन्हा चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. जर आपण सातवा वेतन आयोगाचा विचार केला तर याआयोगा अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन वेळा महागाई भत्ता दिला जातो. पहिल्यांदा जानेवारी आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यात दिला जातो. सरकारने मागील काही दिवसां पहिले तीन टक्के डीए वाढवला होता. जर महागाई भत्ता जुलै मध्ये रिवाईस झाला तर यामध्ये पुन्हा चार टक्के वाढ दिसून येऊ शकते. यादरम्यान ऑल इंडिया कन्सुमर प्राईस इंडेक्स मध्ये महागाई वाढलेली दिसते तर सरकार जुलै मध्ये डी ए वाढवू शकते. जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये यात हलकी वाढ झाली होती. जानेवारी मध्ये डेटा कमी होऊन 125.1झाला होता.तो फेब्रुवारीमध्ये 125 अंकावर आला होता. आता मार्चमध्ये तो वाढून 126 वर पोहोचला. जर आगामी महिन्यांमध्ये तो आणखी वाढला तर डिए वाढणे निश्चित आहे.
डीएची सद्यस्थिती
सरकार दोनदा वर्षात डीए वाढवते. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारे डीए एकदा वाढवला आहे. आता याबाबत असे वृत्त समोर आले आहे की केंद्र पुन्हा एकदा डीए मध्ये चार टक्के वाढ करू शकते आता डीए34 टक्के आहे
जर यामध्ये चार टक्के आणखी वाढ झाली तर तो 38 टक्के होऊ शकतो. या निर्णयामुळे पन्नास लाखांपेक्षा जास्त सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शन धारकांना फायदा होतो.
38 टक्के वाढ झाल्यावर किती वाढेल पगार
या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 56 हजार 900 रुपये आहे त्यांना 38 टक्के महागाई भत्ता झाल्यानंतर एकवीस हजार सहाशे रुपये डी ए मिळेल. आता 34 टक्के डीए च्या हिशोबाने 19 हजार 346 रुपये मिळत आहेत. यामध्ये चार टक्के वाढ झाल्यास पगार मध्ये 22 76 रुपये वाढतील. म्हणजे वार्षिक सुमारे 27 हजार 312 रुपये वाढतील. (स्त्रोत-बहुजननामा)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:आनंदाची बातमी : ट्रॅक्टर खरेदी साठी पाच लाख रुपयांचे अनुदान
Published on: 10 May 2022, 09:34 IST