दरवर्षी शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक आपत्तीमुळे डोक्याला ताप होतो तो म्हणजे पाऊस, पूरपरिस्थिती इत्यादीमुळे शेतीचे भरमसाठ नुकसान होते. नंतर मग शासनाकडून पिकांची पाहणी केली जाते तसेच त्यांचे पंचनामे व नंतर मदतीची प्रक्रिया ही सगळी वेळखाऊ प्रक्रिया झाल्यानंतर मग शेतकऱ्यांच्या हातात मदत येते. परंतु नुकसान झाल्याच्या प्रमाणात मिळणारी मदत किती असते? हा एक संशोधनाचा विषय आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिक पाण्याचे नुकसान झाले तर त्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना आहे.
नक्की वाचा:आता उसातही काटामारी! 4581 कोटींचा घोटाळा, राज्यात खळबळ..
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान झाल्यावर आर्थिक मदत केली जाते. याच पार्श्वभूमीवर आता मागील काही दिवसांपासून राज्यात जो काही पाऊस झाला, या पावसाने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले.
त्यामुळे जी काही पिक विमा कंपनी आणि शासनाचे नुकसान भरपाईची प्रक्रिया आहे ती लांबणीवर पडणार असल्याने अग्रीम नुकसान भरपाईची रक्कम पिक विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्याची मागणी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्या पूर्वीच नुकसानीच्या 25 टक्के रक्कम मिळू शकते. यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्नात असून त्वरित आगाऊ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो सावधान! कीटकनाशकांचा जीवाला धोका, घ्या ही घाबरदारी अन्यथा होईल मोठे नुकसान
अशी मिळू शकते तातडीची मदत?
पावसामुळे जे काही नुकसान झाले ते पाहता आता एनडीआरएफचे निकषांप्रमाणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु पीक विमा योजनेमध्ये एक वेगळी तरतूद आहे.ती म्हणजे या योजनेच्या निकषाप्रमाणे ज्या हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे 50 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास ही मदत दिली जाते.
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे अशा शेतकऱ्यांना अपेक्षित नुकसान भरपाईच्या 25% आगाऊ रक्कम देण्याची महत्त्वाची तरतूद यामध्ये आहे.त्यामुळे या मिळणाऱ्या रकमेचा शेतकऱ्यांना फायदा मिळण्याची शक्यता आहे.
Published on: 06 August 2022, 09:34 IST