मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपध घेतली. यांनतर लगेच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षेत होते. मात्र, तसे झाले नाही.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नव्या सरकार मध्ये शपथ घेऊन आज जवळपास 25 दिवस उलटले. मात्र अजूनही नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलेला नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे (Cabinet Expansion) अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होवून जवळपास चार आठवडे झाले. हा मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) विस्तार दोन दिवसांत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज संध्याकाळी दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये मंत्र्यांच्या यादीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
भाजपकडून कुणाला संधी मिळू शकते?
1. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)
2. गिरीश महाजन (Girish Mahajan)
3. प्रवीण दरेकर (Pravin Darekar)
4. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil)
5. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)
6. आशिष शेलार (Ashish Shelar)
7. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)
Bank Holiday: ग्राहकांनो बँकेतील कामे आजच उरकून घ्या; ऑगस्टमध्ये 17 दिवस राहणार बँका बंद
शिंदे गटाकडून
1. दादा भुसे (Dada Bhuse)
2. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
3. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)
4. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
5. उदय सामंत (Uday Samant) यांना संधी मिळू शकते.
Business: शेतकरी मित्रांनो 85 % अनुदानासह सुरू करा 'हा' व्यवसाय; पहा सरकारची जबरदस्त योजना
Published on: 27 July 2022, 03:47 IST