News

वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील शेतकरी नवनाथ शेंडगे यांच्या 4 एकरातील फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. यामध्ये त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

Updated on 20 March, 2022 2:57 PM IST

यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कारखाने बंद होत आले तरी अनेक ठिकाणी ऊस शिल्लक आहे. यामुळे आपला ऊस घालवण्यासाठी अनेकांची पळापळ सुरु आहे. मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी क्षमतेपेक्षा अधिक ऊसाचे गाळप करुनही अतिरिक्त ऊसाचा प्रश्न हा कायम आहे. 12 महिन्यांपेक्षा अधिकचा काळ होऊनही ऊस फडातच असल्याने वजनात घट होत आहे तर वाढत्या उन्हामुळे आता उत्पादनावरही परिणाम होत आहे.

असे असताना जिल्ह्यात ऊसाला आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यामध्ये सर्वाधिक घटना ह्या महावितरणच्या चूकीमुळेच झालेल्या आहेत. शार्टसर्किट, विद्युत तारांची पडझड यामुळे ऊसाला आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यामुळे शेतकऱ्याची यामध्ये काय चूक असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

येथील वडवणी तालुक्यातील परडी माटेगाव येथील शेतकरी नवनाथ शेंडगे यांच्या 4 एकरातील फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. यामध्ये त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. यामुळे लाखोंचा खर्च आणि सर्वात मोठे नगदी पीक म्हणून वर्षभर केलेली जोपासना सर्वकाही व्यर्थ झाले आहे.

यामुळे सरकारने मदत करावी अशी अपेक्षा शेंडगे यांनी व्यक्त केली आहे. आज पहाटे अचानक त्यांच्या 4 एकरातील ऊसाच्या फडाला आग लागली. त्यांच्या समोर ही घटना घडत असताना ते काहीही करू शकते नाहीत. वारे जास्त असल्याने काही वेळातच ४ एकरावरील ऊस जळून खाक झाला. यामुळे मोठे नुकसान झाले.

दरम्यान, आतापर्यंत याठिकाणी ४०० एकरापेक्षा जास्त ऊस जळाला असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात हा आकडा खूप मोठा आहे. यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. सगळ्याच्या उसाचे गाळप केले जाईल, असे सांगितले असताना मात्र प्रत्यक्षात ऊस जाणार की नाही या कारणामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
जिल्हा बँकेत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा..
बैल उधळले मात्र तिने वेसण सोडली नाही, बैलगाडा जुंपणाऱ्या रणरागिणीचे राज्यात होतय कौतुक..
काय सांगता!! आता शेतकऱ्यांसाठी महावितरणचे अधिकारी रस्त्यावर, काय आहे प्रकरण जाणून घ्या..

English Summary: 'Burn 400 acres of sugarcane in Beed, what do farmers want to do?'
Published on: 20 March 2022, 02:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)