News

सांगलीच्या भाळवणी येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात बैलगाडाप्रेमी उपस्थित होते. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये पुण्याच्या बकासूर व कराडच्या महीब्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली आहे.

Updated on 10 April, 2023 1:34 PM IST

सांगलीच्या भाळवणी येथे बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात बैलगाडाप्रेमी उपस्थित होते. देशातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतीमध्ये पुण्याच्या बकासूर व कराडच्या महीब्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकावत थार गाडी जिंकली आहे.

यामुळे गाडा मालकाचा आनंद गगनाला मावत होता. महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने सांगलीच्या विटा नजीकच्या भाळवणी येथे रुस्तूम-ए-हिंद बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यासह राज्याबाहेरील सुमारे २०० बैलगाडी स्पर्धेक सहभागी झाले होते.

यामध्ये चुरशीच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या मुळीशी येथील मोहिल शेठ धुमाळ यांच्या बकासूर आणि कराडच्या सदाशिव कदम यांच्या महीब्या बैलजोडीने मैदान मारत थार गाडी पटकावली. या बैलगाडा शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील दोन लाखांहून अधिक बैलगाडी शर्यत प्रेमींनी हजेरी लावली होती.

राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान...

या शर्यतीमध्ये थार गाडी कोण जिंकणार याकडे लाखो बैलगाडी शौकिनांच्या नजर लागून राहिल्या होत्या, वेगवेगळ्या गटातून पार पडलेले शर्यतीनंतर चुरशीची अंतीम सामन्यात पुण्याच्या मुळीशी येथील मोहिल शेठ धुमाळ, यांच्या बकासुर आणि कराडच्या सदाशिव कदम यांच्या महीब्या बैलजोडीने मैदान मारले.

सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांना परतफेडीची ऐपत नसतानाही १ हजार २३ कोटी रुपयांचे कर्ज...

यावेळी साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार निलेश लंके, माजी आमदार पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील, आदि मान्यवरांनी उपस्थितीत लावली होती.

सरकारच्या ‘या’ निर्णयाने शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही, किसान सभेने थेट कारण सांगितले..
शूरवीर' म्हैसला तोडच नाही! वय 4 वर्षे, उंची 5.5 फूट आणि किंमत 15 कोटी, देशभरात प्रसिद्ध
मिल्कोमीटर प्रत्येक दूध संकलन केंद्रावर असणे बंधनकारक करणार, शेतकऱ्यांना होणार फायदा..

English Summary: Bullock cart pair hit the ground! Won the Thar car to the owner
Published on: 10 April 2023, 01:34 IST