News

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पुण्यात पार पडत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शर्यतीत दीड कोटींची बक्षिसे आहेत. तसेच इतरही लाखोंची बक्षिसे आहेत. आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत भारतातील सर्वात मोठी असल्याचं बोललं जातं आहे.

Updated on 01 June, 2022 11:00 AM IST

देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत पुण्यात पार पडत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या शर्यतीत दीड कोटींची बक्षिसे आहेत. तसेच इतरही लाखोंची बक्षिसे आहेत. आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत भारतातील सर्वात मोठी असल्याचं बोललं जातं आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, आज मोठ्या उत्साह दिसत आहे. बैलगाडा अखिल भारतीय संघटना, आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली, असेही ते म्हणाले.

तसेच त्यांनी बैलगाडा शर्यतीला (Bull-cart Race) विरोध करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुळशी पॅटर्न (Mulshi Pattern Marathi Movie) चित्रपटामधील बैल कधी एकटा येत नाही, सोबत नांगर घेऊन येतो, हा डायलॉग म्हणून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली. या शर्यतीसाठी हजारोंच्या संख्येने गाडामालक सहभागी झाले होते.

बैलगाडा शर्यत बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं. यामुळे इथून पुढं बैलगाडा शर्यत कधीच बंद होऊ देणार नाही. असंही यावेळी फडणवीस म्हणाले. या शर्यतीसाठी लांडगे यांनी मला हा खास ड्रेस शिवून दिल्याचे सांगत त्यांनी पाहुण्यांना झूल घालून आणले, असे फडणवीस म्हणताच सगळीकडे हास्य उमटले. यामुळे सगळ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

आता ड्रोनच्या सहाय्याने होणार सामानाची डिलेव्हरी, देशातील पहिला प्रयोग यशस्वी

यामुळे फडणवीस यांनी नवीन ड्रेस शिवून दिल्याबद्दल लांडगे यांचे आभार देखील मानले. बैल हा पळणारा प्राणी आहे तसा अहवाल सर्वोच्च न्यायालयात आम्ही सादर केला. म्हणून बैलगाडा शर्यत सुरू झाली. असेही ते म्हणाले. दरम्यान ही स्पर्धा बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तसेच अनेक मान्यवर देखील उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या;
बजाजने सर्वात स्वस्त बाइक केली बंद, सर्वांना परवडणारी गाडी बंद झाल्याने अनेकांची नाराजी
आता तुमची गाडी कधीच पंम्चर होणार नाही, जाणून घ्या सविस्तर
कोथिंबीर उत्पादकांना अच्छे दिन, बाजारात सध्या सर्वाधिक मिळतोय दर

English Summary: bull never comes alone, comes plow'
Published on: 01 June 2022, 11:00 IST