काल राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक घोषणा करण्यात आल्या. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) रविकांत तुपकर ( Ravikant Tupkar) यांनी टीका केली आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे.
ते म्हणाले, अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा. सोयाबीन (soybean) आणि कापसाचा (Cotton) उत्पादन खर्च भरुन निघेल एवढाही भाव खासगी बाजारात नाही. त्यामुळे आज 70 ते 80 सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. सोयाबीन-कापूस उत्पादकांसाठी मदतीचं विशेष पॅकेज घोषित करणं गरजेचे होते.
पण तसे अर्थसंकल्पात काहीच झाले नसल्याचे तुपकर म्हणाले. संत्रा प्रकिया केंद्राची सरकारने घोषणा केली पण अशीच घोषणा 2015 साली टेक्सटाईल पार्कच्या बाबतीत केली होती. आतापर्यंत किती टेक्सटाईल पार्क उभे राहिले? असा प्रश्न देखील रविकांत तुपकरांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती कारखाना लवकरच गतवैभव प्राप्त करणार, नवीन प्रकल्पाच्या कर्जाचा शेवटचा हप्ता राहिला...
शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव देणं गरजेचं आहे. शेतीला पूर्णवेळ वीज मिळण्यासाठी आणि जंगली जनावरांच्या त्रासापासून शेती पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतीला कंपाऊंड करण्यासाठी भरीव तरतूद करणं गरजेचे होते.
त्याने फुकट भाजी विकली, पण त्याच्या डोळ्यातले पाणी कोणाला दिसलेच नाही..
राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केला आहे. शहरी मतदारांना आकर्षित करणारा आणि स्वप्नांचा दुनियेत फिरवणारा हा अर्थसंकल्प असल्याची खोचक टीका रविकांत तुपकरांनी केली.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिक काढणीला आली असतील तर घाई करा, पुन्हा पावसाची शक्यता
शेतकऱ्यांनो गहू, हरभरा, द्राक्ष आणि इतर पिक काढणीला आली असतील तर घाई करा, पुन्हा पावसाची शक्यता
शिंदे सरकारची मोठी घोषणा! नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर, शेतकऱ्यांना मिळणार १२ हजार
Published on: 10 March 2023, 09:33 IST