Wheat Exports: रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भारतासह अनेक देशांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचे बरेच नुकसान झाले आहे. चार महिने उलटूनदेखील युद्धबंदीची अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. युक्रेनमध्ये अजूनही रशियन सैन्य तैनात आहे. या युद्धामुळे भारताला महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. युद्धामुळे अनेक देशांना झळ बसत असून सध्या जगभरात गव्हाच्या टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे.
त्यामुळे जगभरात गव्हाची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. जिथून गहू मिळेल तिथून खरेदी करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान तुर्कीने भारताकडून गव्हाची मागणी केली होती. भारताकडून मिळालेली गव्हाची खेप, गव्हात रुबेला विषाणू असल्याचे कारण सांगून परत केली आहे. एस अँड पी ग्लोबल कमॉडिटी इनसाइट्सच्या अहवालानुसार, एका तुर्की जहाजात 56 हजार 877 टन इतका गहू भरलेला होता.
हे जहाज आता तुर्कीहून गुजरातच्या कांडला बंदराकडे परत निघाले असून तुर्कीने गहू परत केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार गव्हात फायटोसॅनिटरीची समस्या आहे. त्यामुळे त्यांनी 29 मे रोजी भारतातून आलेली गव्हाची खेप परत केली आहे. भारतातील गव्हात रुबेला विषाणू आढळून आल्यामुळे तुर्कीच्या कृषी मंत्रालयाने या गव्हाची खेप घेण्यास नकार दिला आहे.
पावसाळ्याच्या तोंडावर राज्यमंत्री बच्चू कडूंचा मोठा गौप्यस्फोट; बियाणांबाबत मोठे वक्तव्य
आता जूनच्या मध्यापर्यंत गव्हाने भरलेले तुर्कीचे जहाज कांडला बंदरात परत येईल अशी माहिती इस्तंबुलमधील एका व्यापाऱ्याने दिली आहे. रशिया व युक्रेन हे देश गव्हाचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. गव्हाच्या जागतिक बाजारपेठेत, या दोन देशांचा मोठा वाटा आहे. जगातील एक चतुर्थांश गव्हाचा पुरवठा या देशांमधून केला जातो.
भारताकडून अनेक देशांना गव्हाची निर्यात करण्यात आली होती. येत्या काळात इजिप्तसह इतर देशांमध्ये गव्हाच्या खेपा पोहचणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने गहू निर्यात बंदी घातली असतानाही जवळजवळ 12 देशांनी भारताकडे गव्हाची मागणी केली. निर्यातबंदी लागू केली असतानाही भारताने इजिप्तला 60 हजार टन गहू निर्यात केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! कोरोना रुग्ण वाढत चालल्याने मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
आख्ख मार्केट आता आपलंय! उच्च शिक्षण घेऊन देखील पठ्या कंपनीत विकतोय फळे, करतोय लाखोंची कमाई
Published on: 02 June 2022, 02:44 IST