बिहारमध्ये भाजप-जेडीयू युती तुटणे जवळपास निश्चित झाले असून भाजपनेही नितीशकुमार यांच्यापासून वेगळे होण्याचे मन बनवले आहे. दरम्यान, एक नवीन समीकरण तयार होत आहे. पाटणा येथील 1 आणे मार्ग आणि राजभवनची सुरक्षा वाढवण्यात आलीय. खरं तर, सीएम नितीश कुमार (Nitish Kumar) 1 आणे मार्गावरील निवासस्थानी जेडीयूच्या (JDU) सर्व खासदार आणि आमदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत.
बिहारच्या राजकारणासाठी ही बैठक खूप मोठी मानली जात आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारमध्ये सुरू असलेल्या एनडीए सरकारशी संबंधित मोठा निर्णय घेऊ शकतात. नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून आता ते पुन्हा राजदसोबत सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. भाजपचे सर्व 16 मंत्री राजभवनात जाऊन राज्यपालांकडं राजीनामे सादर केले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार सरकार पाडणार नाहीत किंवा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. नितीशकुमार भाजपच्या कोट्यातील मंत्र्यांना बडतर्फ करू शकतात. मंत्रिमंडळात 16 मंत्री भाजपच्या कोट्यातील आहेत, त्यापैकी दोन उपमुख्यमंत्री आहेत. दरवेळेप्रमाणेच नितीशकुमार यावेळीही काही नवीन पद्धत आणू शकतात. मंत्र्यांची हकालपट्टी झाल्यास नितीशकुमार यांना लगेचच महाआघाडीचा पाठिंबा मिळेल.
काझडमध्ये मोफत बियाणे वाटप, पोषणयुक्त आहारासाठी सरकारचा प्रयत्न, शेतकऱ्यांचा मोठा प्रयत्न
नितीश कुमार यांनी भाजपचे सरकार पाडले, तर त्यांचे पुढचे पाऊल काय असेल, असा सवाल उपस्थित होत आहे. बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आपला मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तेजस्वी यादव यांच्या नावाशी तडजोड करेल का, हाही प्रश्न आहे. नितीशकुमार महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री कसे होणार आणि त्यासाठी पुढाकार कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना नोटीस; राज्याच्या राजकारण खळबळ
नितीश कुमार राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनात जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांना राज्यपालांनी साडे बारा वाजता भेटीची वेळ दिली आहे. काँग्रेस-डाव्या पक्षांनी आपल्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तेजस्वी यांना सुपूर्द केलंय. पाटणा येथील राबडी निवासस्थानी झालेल्या महाआघाडीच्या बैठकीत तेजस्वी यांना हे समर्थन पत्र देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या;
अशी वाईट परिस्थिती कोणाच्या वाट्याला न येवो! पैसे नसल्याने पाकिस्तानने विकायला काढले वाघ, सिंह
सर्वांना हसवणारा तारा निखळला! मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन
आता बिहारचा नंबर! उद्या बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होणार? जेडीयूने खासदार-आमदारांची बैठक..
Published on: 09 August 2022, 12:49 IST