News

भाजपचे पिंपरी चिंचवडचे जेष्ठ नेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (वय-५९) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, शंकर आणि विजूअण्णा जगताप असा परिवार आहे.

Updated on 03 January, 2023 12:23 PM IST

भाजपचे पिंपरी चिंचवडचे जेष्ठ नेते आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप (वय-५९) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, शंकर आणि विजूअण्णा जगताप असा परिवार आहे.

त्यांनी ४ वेळा नगरसेवक तर चार वेळा आमदार म्हणून कार्यभार पाहिला. आमदार जगताप यांनी सध्याचे विरोधीपक्ष नेते असणाऱ्या अजित पवार यांचे वर्चस्व असलेली पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आणून दिली होती.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. यामुळे येणाऱ्या काळात त्यांची गरज भाजपला दिसून येणार आहे. जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते.

लग्नात वाजवले फटाके आणि उसाला लागली आग, ६ लाखाचे नुकसान..

प्रबळ इच्छाशक्तीमुळे अखेर पर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत आजारी असताना देखील मतदान केले होते. २०१९ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि चौथ्यांदा आमदार झाले.

तीतर पालनातून करा लाखोंची कमाई, शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर..

त्यांच्या निधनावर सर्व राजकिय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मंत्रीपदासाठी देखील त्यांचे नाव चर्चेत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून त्यांची ओळख होती.

महत्वाच्या बातम्या;
उगीच कोणी शेतकरीराजा म्हणत नाही!! शेतकरी घालतोय हार्ले डेव्हिडसनवर दूध, बघणारे गेलेत कोमात
शेतकऱ्यांचे 100 टन उसाचे उत्पन्न बघून शरद पवारांनी लावला थेट वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला फोन आणि...
गरिबांना मोफत रेशन देण्याचा केंद्राचा निर्णय, 81 कोटी नागरिकांना होणार फायदा

English Summary: Breaking! Pimpri Chinchwad BJP MLA Laxman Jagtap passed away
Published on: 03 January 2023, 12:23 IST