राज्यातील दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या खाणी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली. त्यांनी राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याबाबतच्या माहितीला दुजोरा दिला.
याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचंही सांगितलं जातं आहे. यामुळे यामध्ये खरेच सोनं सापडले तर याचा नक्कीच फायदा होईल. यामुळे याबाबत आता शोध घेतला जात आहे. याठिकाणी सोन्याचे दोन ब्लॉक आहेत.
एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांना FRP चे पैसे मिळायला हवे, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई
हे सोनं निघालं तर ती महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल, सोन्याचे हे दोन ब्लॉक विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणतील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असल्याचंही सांगितलं जातं आहे. राज्याच्या भूगर्भात जर खनिजांचा साठा आढळून आला तर देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरु केला जाऊ शकतो.
एका महिन्यात FRP चे पैसे मिळायला हवे, अन्यथा साखर कारखान्यांवर कारवाई, सहकार मंत्र्यांची माहिती
मुंबईत खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. यावेळी केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादा भुसे उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या;
हमीभावाचा कायदा करायचा झाल्यास ग्रामपंचायत ते संसदेपर्यंतची लढाई आता रस्त्यावर सुध्दा लढणार
आता सर्वसामान्यांसाठी राष्ट्रपती भवन खुले, अनेकांचे स्वप्न होणार पूर्ण..
शेतकऱ्यांना ही बँक काहीही गहाण न ठेवता देतेय कर्ज, दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना सुवर्णसंधी..
Published on: 02 December 2022, 11:57 IST