News

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif News) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Updated on 11 January, 2023 10:48 AM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif News) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या घरावर सकाळी सहा वाजल्यापासून छापेमारी सुरु केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हसन मुश्रीफ यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप केले होते. तसेच त्यांच्यावर ईडीची छापे पडणार असल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे अखेर आज कारवाई केली जात आहे. सोमय्या यांनी कारखान्याला देखील भेट दिली होती.

दरम्यान, मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर छापे पडल्याची माहिती समोर येत आहे. आपासाहेब नलवडे कारखान्यामधील झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून हे प्रकरण आहे. हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणावरून आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत.

शेतकऱ्यांनो काळाबरोबर बदलतात मालमत्तेचे प्रश्न

हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली आहे. काही समजण्या अगोदरच अधिकाऱ्यांनी बंगल्यामध्ये प्रवेश केला आणि छाप्यास सुरुवात केली.

'लॅाकडाऊनमध्ये अडचणीत सापडलेल्या पॅालिहाऊस ग्रीनहाऊस शेतकऱ्यांना एक रक्कमी कर्ज परतफेड योजना राबवा'

दरम्यान, याठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी बंदोबस्त झालेले सर्व पोलीस दिल्ली पोलिस दलातील आहेत. यामुळे कारवाईत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
दर 10 तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या! मायबाप सरकार याकडे लक्ष द्या...
आमदारसाहेब लग्नासाठी तुमच्या सर्कलमध्ये पोरगी बघा!! लग्नासाठी मुलगी मिळेना, तरुणाचा थेट आमदाराला फोन...
जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे

English Summary: Breaking! ED raids house of NCP leader Hasan Mushrif in factory scam case
Published on: 11 January 2023, 10:48 IST