शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहेत. त्यांना दिवसा विजेचे भारनियमन सुरु आहे आणि रात्री वीज शेतीसाठी वीज सोडली जात आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनातून (Maharashtra Assembly Winter Session) काहीतरी दिलासा मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, राजकीय आरोप प्रत्यारोप करण्याव्यतिरिक्त कुठलीही चर्चा अधिवेशनात झाली नाही.
यामुळे शेतजऱ्यांच्या मागे लागलेली साडेसाती काही केल्या संपत नाही. सध्या कडाक्याच्या थंडीत देखील रात्रीचा दिवस करताना शेतकरी आपल्याला दिसून येत आहेत. हाडं गोठवणाऱ्या या थंडीत रात्री ब्लॅंकेट अंगावर घेऊन सगळेजण जेव्हा साखर झोपेत असतात तेव्हा दुसरीकडे बळीराजा मात्र, याच रात्रीचा दिवस करत आहे.
रानात हे शेतकरी राबत आहेत. महावितरणकडून केले जाणारे वीज भारनियमन हे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दिवसा शेतीसाठी वीज सोडली जात नाही आणि रात्री शेतीसाठी वीज दिली जात आहे. यामुळे या कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांना जागूव रात्र काढावी लागत आहे. तसेच शेतात बिबट्याचा वावर कायम असल्याने रात्री शेतात राबताना बिबट्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
जोपर्यंत शेतकरी घरी येत नाहीत तोपर्यंत घरच्यांच्या मनात धाकधूक आणि चिंता कायम असते. ऐन थंडीत स्वेटर, मफलर आणि पायात गमबूट घालून रात्री 12 च्या ठोक्याला ते घराबाहेर पडतात. मोटर सुरू करत पिकांना पाणी देण्यासह इतर मशागत त्यांना करावी लागत आहे. तसेच वीज चालू करताना देखील त्यांना धोका असतो.
जानेवारीत कापसाचे भाव वाढणार, शेतकऱ्यांनो थोडा धीर धरा..
विजेची समस्या, अवकाळी पावसाचे संकट, शेतमालालाही न मिळणारा दर या सर्व परिस्थितीला शेतकऱ्यांना सध्या सामोरं जावं लागत आहे. यामुळे यावर कायमचा तोडगा काढण्याची गरज आहे. यामुळे खऱ्या अर्थाने शेतकरी या संकटामधून बाहेर पडेल.
महत्वाच्या बातम्या;
भीमा पाटसची गाडी अखेर रुळावर, ८ दिवसात १९ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप, शेतकरी समाधानी
Beed Farmers; शेतकऱ्यांच्या खात्यातून परस्पर उचलले पैसे, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील घटना..
बारामतीत बेकायदा कत्तलखान्याबाबत नगरपालिकेला नोटीस, दोन वर्षांपूर्वी अजित पवारांनी दिले होत आदेश
Published on: 28 December 2022, 12:43 IST