भोंगा, अजाण, हनुमान चालीसा या सर्व विषयांवर चाललेला राजकीय उहापोह पाहता या सगळ्या धार्मिक वातावरणात शेतकरी उपेक्षित रहात असल्याची भूमिका हिंदुस्थान मानव पक्षाने मांडली आहे. सामाजिक विषमता वाढविणे, धार्मिक तेढ निर्माण करणे इत्यादी बाबी हा सामाजिक अपराध असून त्यावर टीका करीत असताना शेतकऱ्यांसाठी भोंगा वाजवा असे आवाहन हिंदुस्थान मानव पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितेंद्र पुंडे यांनी सातारा येथील मुख्य पक्ष कार्यालयातून केले.
प्रत्येक राजकीय पक्षाने शेतकरी केंद्रबिंदू मानून बळीराजाला जगवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे अजाण करा, हनुमान चालीसा म्हणा, महाआरती करा पण हे सगळे शेतकऱ्यांसाठी करा अशीही मागणी पक्षातर्फे करण्यात आली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष शेतकऱ्यांना फक्त मतदानापुरते डोळ्यासमोर ठेऊन आपल्या राजकीय पोळी भाजून घेत आहे.
पण तो एक काबाडकष्ट करणारा घटक असून जगाचा पोशिंदा असल्याचे सर्वच विसरून जातात. शेतकरी जगला तर आपण सारे जगू हे सत्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी आवाज उठवा असेही ते म्हणाले. जेव्हा धार्मिक तेढ निर्माण होते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा त्याचा परिणाम बाजार समितीसह शेतकऱ्याच्या शेतमालावर होतो.
त्यामुळे राजकीय पक्षांनी अशा भूमिका घेणे शेतकऱ्यांच्या हिताचे नसल्याचे पुंडे म्हणाले. तर असे राजकारण करताना नकळत शेतकरी उपेक्षित रहात आहे. त्यामुळे भविष्यात मानवतेबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका पक्षाची असणार असल्याचे येते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो या फुलाला परदेशातही मोठी मागणी आहे, कमी खर्चात मिळवा मोठा नफा..
धेनू अँपच्या आधुनिक तंत्रामुळे शेतकऱ्यांना लाखों रुपयांचा फायदा
शेतकऱ्यांनो उष्णतेपासून जनावरांना वाचवायचे असेल तर ही होमिओपॅथिक औषधे वापरा, दूधही वाढेल
Published on: 30 April 2022, 10:42 IST