कोरोनानंतर बर्ड फ्लू ही भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यांमधील पोल्ट्री फार्म मधील कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे तसेच ९ राज्यांमध्ये कावळे आणि स्थलांतरित आणि रानटी पक्षांमध्ये याचे विषाणू आढळल्याचे केंद्रीय मासेमारी, पशुसंवर्धन आणि दुग्ध उत्पादन खात्याने स्पष्ट केले.
त्यापैकी महाराष्ट्र, छत्तीसगड, हरियाणा आणि मध्यप्रदेश मध्ये असलेल्या पोल्ट्री मधील पक्षांची कत्तल करण्यात येत आहे.केंद्रीय पथक देशाच्या ज्या भागांमध्ये बर्ड फ्लूची साथ पसरली आहे त्या भागाचा दौरा करत आहे. महाराष्ट्राला सुद्धा या पथकाने भेट दिली. त्यानंतर केरळमध्ये सुरू असलेल्या साथीचा ही अभ्यास सुरू केला गेला आहे. बर्ड फ्लूचा विचार केला तर हा आजार सप्टेंबर ते मार्च या काळामध्ये पसरतो. हा आजार जनावरांमधील माणसांमध्ये संक्रमित होतो. परंतु आपल्या देशाचा विचार केला तर अजून एकही अशा पद्धतीचे उदाहरण सापडलेली नाही. ज्या ठिकाणी या साथीचा उद्रेक झालेला आहे त्या ठिकाणावरील पोल्ट्रीमधील पक्षी मारण्याचे काम सुरू आहे. त्याबरोबरच स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण याचेही काम सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा : बर्ड फ्लूचं संकट; पोल्ट्री उद्योगाला दररोज होतय ७० कोटी रुपयांचे नुकसान
लातूर जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यातील केंद्रेवाडी, अहमदपूर, सुकनी तसेच उदगीर तालुक्यातील तोंडार तसे औसा तालुक्यातील कुर्द वाडी त्या गावांमध्ये हे काम पूर्ण झाले आहे. या बर्ड फ्लूबद्दल सोशल मीडिया जसे की ट्यूटर, फेसबुक इत्यादींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे.
Published on: 20 January 2021, 10:30 IST