News

कांदा या पिकाचा विचार केला तर याला लॉटरी पिक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.कारण कधी कधी कांदा हे शेतकऱ्यांना इतके काही देऊन जाते की शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होतो. परंतु ही वेळ क्वचितच येते. परंतु बऱ्याचदा कांदा शेतकऱ्यांना रडवतोच. जर आपण महाराष्ट्राचा यावर्षीचा कांदा बाजारपेठेचा विचार केला तर कवडीमोल दराने कांदा विकला जात आहे.

Updated on 13 September, 2022 12:01 PM IST

 कांदा या पिकाचा विचार केला तर याला लॉटरी पिक म्हटले तरी वावगे ठरणार नाही.कारण कधी कधी कांदा हे शेतकऱ्यांना इतके काही देऊन जाते की शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होतो. परंतु ही वेळ क्वचितच येते. परंतु बऱ्याचदा कांदा शेतकऱ्यांना रडवतोच. जर आपण महाराष्ट्राचा यावर्षीचा कांदा बाजारपेठेचा विचार केला तर कवडीमोल दराने कांदा विकला जात आहे.

नक्की वाचा:जिरेनियम शेती सेंद्रिय सॉईल मल्टिप्लायर साथीने वाढवा उत्पन्न

 या परिस्थितीला बऱ्याचशा प्रमाणात सरकारी धोरणे कारणीभूत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या बाबतीत अनेक वर्षापासून बर्‍याच प्रकारच्या मागण्या महाराष्ट्रात आहेत.  परंतु सरकारचे याबाबतीतली असलेली उदासीनता कायमच दिसून येते.परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बिहार सरकारचा विचार केला तर बिहार सरकारने शेतकऱ्यांना कांदा लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

नक्की वाचा:Agri News: विदर्भातील संत्रा उत्पादकांवर तीन वर्षापासून संकट,भरपाई मात्र शून्य

कांदा लागवडीसाठी एका हेक्टरवर 49 हजार अनुदान

 आपण बिहार राज्य सरकारचा विचार केला तर तेथील फलोत्पादन विभागाने राज्यात कांद्यासह इतर कृषी उत्पादनांच्या लागवडीला प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष फलोत्पादन पीक योजना सुरु केली असून या अंतर्गत कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 49 हजार रुपये देण्यात येणार आहे

व ही रक्कम अनुदान अंतर्गत दिली जाणार आहे. यासाठी तसे पाहायला गेले तर 50 टक्के अनुदान निश्चित केले गेले आहे व एक हेक्‍टरवर 98 हजार रुपये खर्च निश्चित करण्यात आला असून एक हेक्‍टरसाठी 49 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.

याचा लाभ बिहार राज्यातील बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असून यामध्ये बिहार राज्यातील औरंगाबाद,भागल्पुर,दरभंगा,पूर्व आणि पश्‍चिम चंपारण्य,समस्तीपुर,सीतामढी इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे.

नक्की वाचा:Soyabean Rate: सोयाबीनच्या वायदेबंदीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो का फटका? वाचा सविस्तर

English Summary: bihar government give 49 thousand rupees subsidy per hector for onion cultivation
Published on: 13 September 2022, 12:00 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)