News

आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांना नाशिक आणि जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि एका अधिकाऱ्याने केलेल्या गैरवर्तनाच्या संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

Updated on 08 March, 2023 2:50 PM IST

आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आमदार बच्चू कडू यांना नाशिक आणि जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि एका अधिकाऱ्याने केलेल्या गैरवर्तनाच्या संदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नसल्याच्या वादातून आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. शिवीगाळही केली. पोलिसांनी मध्यस्थी करून पुढील प्रकार थांबवला आणि कडू यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणणे आणि अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

विखे पिता पुत्रांचा अजित पवार यांना मोठा झटका; अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भाजपच्या ताब्यात

नेमके काय आहे प्रकरण :

आमदार बच्चू कडू यांनी नाशिक महापालिका आयुक्तांवर हात उचलला. यानंतर आमदार बच्चू कडू यांनी सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नाशिक न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. नाशिक आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी बच्चू कडू यांना दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. सन 2017 मध्ये नाशिक महापालिकेत अपंगांच्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू झाले. आमदार बच्चू कडू यांनी महापालिका आयुक्तांना धमकावण्याचा आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता.

"स्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया" : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 353 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 1 वर्षाची तर सरकारी अधिकाऱ्याचा अवमान केल्याप्रकरणी 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

यापूर्वी 2014 मध्ये अचलपूरचे आमदार म्हणून निवडून आल्याच्या तक्रारीत तत्कालीन जलसंपदा व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोषी ठरवून न्यायालयाने त्यांना दोन महिन्यांची साधी कैद आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार न्यायालयाने हा निकाल दिला.

English Summary: Biggest news now, MLA Bachu Kadu sentenced to 2 years
Published on: 08 March 2023, 02:50 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)