News

या गळीत हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठा ऐरणीवर राहिला आहे. अजूनही राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न काही मिटलेला नाही. गळीत हंगाम जवळपास संपुष्टात या मार्गावर आहे मात्र अजूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा (Sugarcane Producer Farmer) ऊस फडतच बघायला मिळत आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अतिरिक्त उसाबरोबरच (Extra Sugarcane) सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय म्हणजे उसाची एफआरपी.

Updated on 23 April, 2022 6:42 PM IST

या गळीत हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्न मोठा ऐरणीवर राहिला आहे. अजूनही राज्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न काही मिटलेला नाही. गळीत हंगाम जवळपास संपुष्टात या मार्गावर आहे मात्र अजूनही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा (Sugarcane Producer Farmer) ऊस फडतच बघायला मिळत आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. अतिरिक्त उसाबरोबरच (Extra Sugarcane) सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय म्हणजे उसाची एफआरपी.

शेतकरी मित्रांनो (Farmer) जसं की आपणास ठाऊकच आहे उसाची एफआरपी (FRP)  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता दोन टप्प्यात दिली जात आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऐन भांडवलाच्या वेळी भांडवल उपलब्ध होत नाही. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आगामी ऊस गाळप हंगामात एकरकमी एफआरपी घेतल्याशिवाय एकही कारखाना सुरू होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे.

राजू शेट्टी यांनी सांगितले की, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) जून महिन्यापासूनच आंदोलन सुरू करणार आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांनी दोन टप्प्यात एफआरपी देऊन केवळ साखर कारखाना सुरू करून दाखवावा असा इशारा देखील दिला आहे. एकंदरीत राजू शेट्टी यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा उसाच्या एफआरपीचा प्रश्न ऐरणीवर आला असून आगामी काही काळात याची उसाच्या फडापासून ते दिल्लीच्या दरबारा पर्यंत चर्चा बघायला मिळू शकते.

हेही वाचा:- आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना फक्त 6 हजारच नाही तर 36 हजार रुपये मिळतील; मात्र हे काम करावे लागेल

राजू शेट्टी यांनी कराड येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना हे सूचक वक्तव्य केले आहे. राजू शेट्टी यांनी यावेळी नमूद केले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकार मध्ये समान कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून समाविष्ट झाली होती. मात्र, महा विकास आघाडी सरकारमध्ये समान कार्यक्रमाच्या नावावर बोंबाबोंब असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडली असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शेट्टी यांच्या मते, ठाकरे सरकारने एक रक्कम एफआरपी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणे गरजेचे होते मात्र ते झाले नाही.

हेही वाचा:-मोठी बातमी! या पद्धतीने e-KYC केली नाही तर PM Kisan चा 11 वा हफ्ता बँकेत जमा होणार नाही

शेट्टी यांनी पुढे बोलताना नमूद केले की आज सर्व गोष्टींचे भाव आकाशाला गवसणी घालत आहेत. याचा सर्वाधिक फटका शेतकर्‍यांना बसत आहे. महागाई वाढल्याने रासायनिक खत,औषध, बियाणे इत्यादी शेती उपयोगी निविष्ठावर अधिक खर्च आता शेतकरी बांधवांना करावा लागत आहे.

शेट्टी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडताना सांगितले की, सध्या ऊस उत्पादित करण्यासाठी टनामागे 214 रुपये उत्पादन खर्च वाढला आहे. साखर कारखानदार सात ते आठ महिने साखर साठवून ठेवतात मात्र त्यावरील व्याज देताना त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते मात्र शेतकरी बांधव 20 ते 21 महिने ऊस फडातच राहू देतो, मग शेतकऱ्यांचा विचार कुणी करावा असा खोचक सवाल देखील यावेळी शेट्टी यांनी उपस्थित केला.

हेही वाचा:-मोठी बातमी! सोने तारण ठेऊन SBI देणार शेतकऱ्यांना 'एवढे' लोन

शासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या या समस्यांचा विचार करावा आणि एक रकमी एफआरपी त्यांना द्यावी अशी मागणी यावेळी शेट्टी यांनी केली. आगामी गाळप हंगामात साखर कारखानदारांनी केवळ एक रकमी एफआरपी न देता साखर कारखाना सुरू करून दाखवावा असा इशारा देखील यावेळी शेट्टी यांनी दिला आहे. राजू शेट्टी यांच्या या वक्तव्यामुळे उसाच्या एफआरपी चा प्रश्न तर ऐरणीवर आलाच आहे मात्र आगामी गाळप हंगामात यावरून राजकारण देखील तापण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाऊ लागली आहे.

महत्वाची बातमी:- Cotton Farming : कापसाची शेती मिळवून देईल बक्कळ पैसा

English Summary: Big news: Raju Shetty will start agitation to get one FRP of sugarcane
Published on: 23 April 2022, 06:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)