News

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैयक्तिक शेततळे योजना वादात सापडली आहे. या योजनेच्या अनुदानवितरणात संशयास्पद कामांना मंजुरी दिली जात असल्याबद्दल कृषी आयुक्तालयाने चौकशी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Updated on 08 August, 2023 9:39 AM IST

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री वैयक्तिक शेततळे योजना वादात सापडली आहे. या योजनेच्या अनुदानवितरणात संशयास्पद कामांना मंजुरी दिली जात असल्याबद्दल कृषी आयुक्तालयाने चौकशी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मृद्‍संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन संचालकांच्या अखत्यारित शेततळ्यांची योजना नियंत्रित केली जाते. मृद्‍संधारण विभागाकडे चौकशीसाठी स्वतःची यंत्रणा नाही. त्यामुळे कृषी खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून ही चौकशी होईल, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील शेततळ्यांबाबत गंभीर स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केले गेले आहेत. त्यामुळे मृद्‍संधारण संचालक रवींद्र भोसले यांनी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोल्ट्री व्यवसायिकांना वीजदरात सवलत द्या, राज्य सरकारकडे मागणी

पारनेरच्या रामराव सातकर यांनी दाखल केलेल्या शेततळ्याच्या तक्रारींबाबत विशेष चौकशी अधिकारी नेमावा. तसेच चौकशीचा सविस्तर अहवाल मृदसंधारण विभागाला सादर करावा, असे सूचित करण्यात आले आहे.

शेतमालावर आता ४ तासात कर्ज, राज्य सहकारी बँकेची योजना, आतापर्यंत १०० कोटींचे वाटपही झाले...

यात कृषी खात्याचे काही अधिकारी व ठेकेदार सामील असल्याची चर्चा असताना आता नगरमधील चौकशी सुरू झाल्यामुळे शेततळे योजना चर्चेत आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

FRP वरील रकमेला कर सवलत दिल्यामुळे महाराष्ट्राला ८,००० कोटींचा फायदा, फडणवीस यांची माहिती
एका एकरात मिळणार 60 लाखांचे उत्पन्न, अशा प्रकारे या फळाची लागवड

English Summary: Big news! Farm malpractice inquiry order..
Published on: 08 August 2023, 09:39 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)