News

राज्याच्या सहकार आयुक्तांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत टोकाई साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Updated on 11 March, 2023 1:35 PM IST

राज्याच्या सहकार आयुक्तांनी हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत टोकाई साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या टोकाई कारखान्याविरोधात राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. आदेश राज्य सरकारने हिंगोली जिल्हा प्रशासनाला टोकाई साखर कारखाना जप्त करण्याचे दिल्याची माहिती समोर आली आहे.

१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान विकलेल्या उसाचे २२ कोटी रुपये थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे टोकाई सहकारी साखर कारखान्यावर भाजपचे नेते शिवाजीराव जाधव यांची सत्ता आहे.

कारखान्याच्या संपत्तीच्या लिलावासंदर्भात कार्यवाही केली जाईल अशी माहिती हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. परंतू कारखान्याला ऊस दिलेल्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार? असा प्रश्न यामुळं निर्माण झाला आहे.

राज्यातील बाजार समितींत शेतकऱ्यांना मुक्कामासाठी शेतकरी भवन आणि जेवणासाठी थाळी मिळणार..

पण शेतकऱ्यांचे पैसे थकवल्याप्रकरणी या कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. अधिवेशनादरम्यान, राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनी याबाबत सहकार मंत्री अतुल सावे यांना प्रश्न विचारला होता.

हरियाणामध्ये 39 व्या राज्यस्तरीय पशु मेळाव्याचे आयोजन, विजेत्याला 50 लाख रुपये मिळणार

त्यानंतर सहकार आयुक्तांनी कारखान्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. टोकाई कारखान्याने सध्या चालू हंगामातील २३.३० कोटींचे थकबाकी शेतकऱ्यांना देणे शक्य नसल्याचे पत्र साखर आयुक्तांना दिले होते.

यावरर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. काही कारखान्यांनी गाळप बंद देखील केलं आहे. अशातच काही कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची देणी न दिल्यानं बळीराजा संकटात सापडला आहे.

महत्वाच्या बातम्या;
या जातीच्या कोंबडीचे संगोपन आहे फायदेशीर, एक अंडे 100 विकलं जातंय, जाणून घ्या..
शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत वीज उपलब्ध करून देणार! फडणवीसांची माहिती
महात्मा जोतीराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण १.५० लाखांहून ५ लाख रुपये मिळणार

English Summary: Big news! Confiscation order for BJP-owned sugar factory, what is the case?
Published on: 11 March 2023, 01:35 IST