Raid On Vaidyanath Cooperative Sugar Factory: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर GST विभागाचा छापा पडला आहे. आज सकाळी १० वाजता GST चे अधिकारी पंकजा मुंडे यांच्या परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात पोहोचले आहेत. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरु आहे.
केंद्र सरकारचा जीएसटी थकवल्याप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. तर काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता लगेच GST विभागाकडून ही कारवाई होत असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांवर पडणार पैशांचा पाऊस! 'या' तारखेला खात्यात येणार 1 लाख 20 हजार रुपये
भाजपविरोधी नेत्यांवरच केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होते, त्यांच्याच चौकशा होतात, असा आरोप विरोधी पक्षांकडून वारंवार करण्यात येतो. अशातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याच साखर कारखान्यावर छापेमारी झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
ड्रोन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मिळणार सबसिडी! या स्टार्टअपमध्ये महेंद्रसिंग धोनीची गुंतवणूक
तर पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये चर्चेत आल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील भगवानगडावरील नारळी सप्ताहाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि पंकजा मुंडे यांचे बंधू हे एकाच व्यासपीठावर दिसून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. आजदेखील धनंजय मुंडे, पंकजा मुंडे या नारळी सप्ताहाच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. मात्र इकडे परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाची छापेमारी सुरु आहे.
Published on: 13 April 2023, 02:11 IST