News

मोदी सरकारने (Modi Government) 24 फेब्रुवारी 2019 रोजी संपूर्ण देशात पीएम किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) अमलात आणली होती. ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना (Central Government Scheme) आहे.

Updated on 28 April, 2022 2:56 PM IST

मोदी सरकारने (Modi Government) 24 फेब्रुवारी 2019 रोजी संपूर्ण देशात पीएम किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) अमलात आणली होती. ही मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना (Central Government Scheme) आहे.

या योजनेअंतर्गत गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना केंद्र सरकारद्वारे (Central Government) वार्षिक सहा हजार 2000 रुपयाच्या एकूण तीन हफ्त्याच्या स्वरूपात दिले जातात. मध्यंतरी पीएम किसान योजनेचा अनेक अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आता रायगड जिल्ह्यातही (Raigad District) या योजनेचे अपात्र शेतकरी आढळून आले आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात एकूण 26 हजार शेतकरी या पीएम किसान सम्मान निधि योजनेसाठी अपात्र असूनही त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. या प्रकरणात अधिक माहिती अशी की, पुणे विभागाच्या कृषी आयुक्तालयाकडून रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाला अपात्र शेतकऱ्यांची माहिती नुकत्याच काही दिवसांपूर्वी देण्यात आली आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! वाडा तालुक्यात आयोजित होणार कोकणातलं पहिलं कृषी प्रदर्शन; नितीन गडकरी असणार उद्घाटक

एवढेच नाही या संबंधित अपात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर या योजनेचा पैसा जमा करण्याचे आव्हान देखील करण्यात आले आहे. अर्थातचं आता रायगड जिल्ह्यातील पीएम किसान योजनेच्या अपात्र शेतकऱ्यांकडून सुमारे 11 कोटी रुपये वसूल केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. रायगड जिल्ह्यातील जवळपास 26 हजार 618 शेतकरी पी एम किसान योजनेसाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यास अक्षय ठरले असून हे शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत.

हेही वाचा : Breaking News : शेतकऱ्यांना मोदी सरकार अक्षयतृतीयेला देणार एक खास भेट; वाचा काय आहे माजरा

यामुळे या अपात्र शेतकऱ्यांकडून आता 11 कोटी 47 लाख 32 हजार रुपये शासनाकडून वसूल केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या अपात्र शेतकऱ्यांना या योजनेचा पैसा परत करण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम देखील सरकारने जारी केला आहे. यामुळे निश्चितच आगामी काही दिवसात या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यास वचक बसणार आहे. शासनाच्या या कारवाईमुळे पीएम किसान योजनेला अजून पारदर्शकता येणार असल्याचे तज्ञांकडून सांगितले गेले आहे.

हेही वाचा : आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना फक्त 6 हजारच नाही तर 36 हजार रुपये मिळतील; मात्र हे काम करावे लागेल

English Summary: Big news! 26,000 farmers in 'Ya' district disqualified for PM Kisan Yojana; The plan will have to be refunded within seven days
Published on: 28 April 2022, 02:56 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)