Kharif Season: भारत हा कृषीप्रधान देश असल्याने शेतकऱ्यांचे हित सर्वात वर ठेवणे गरजेचे आहे. यामुळे मोदी सरकारने (Modi government) देशभरातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ जाहीर करण्यात आली आहे. आता त्याच दराने सरकार शेतकऱ्यांकडून खरीप पिकांची खरेदी करणार आहे.
एमएसपी वाढवलेले पीके
भात (सामान्य), भात (ए ग्रेड), ज्वारी (हायब्रीड), ज्वारी (मालदांडी), बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल बियाणे, सोयाबीन, तीळ, रामतीळ, कापूस (मध्यम फायबर), कापूस (लांब फायबर) वर एमएसपी वाढवली आहे.
ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, तूर, मूग, धान, मका आणि सोयाबीनचा एमएसपी (MSP will increase in kharif crop) वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फायदा होणार आहे.
Success Story: सावित्रीच्या लेकींनी करून दाखवले; महिलांची शेळी पालनातून कोटींची उड्डाणे
पिकाच्या हमीभावात झालेली वाढ
खरीप हंगामातील पिकांवरील किमान आधारभूत किंमत ( MSP ) मध्ये प्रचंड वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Published on: 09 June 2022, 10:11 IST