News

गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेत अनेक घडामोडी घडत आहेत. याठिकाणी मोठी आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. महागाई वाढली असून आता नेमकं काय होणार या चिंतेत देशातील नागरिक आहेत. यामुळे नागरिकांचा मोठा उद्रेक बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन केली जात आहेत. आता या आंदोलनाने आता उग्र रुप धारण केले आहे. काल आंदोलनकर्त्यांनी थेट राष्ट्रपती भवनावरच मोर्चा वळवला.

Updated on 10 July, 2022 2:01 PM IST

गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेत अनेक घडामोडी घडत आहेत. याठिकाणी मोठी आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. महागाई वाढली असून आता नेमकं काय होणार या चिंतेत देशातील नागरिक आहेत. यामुळे नागरिकांचा मोठा उद्रेक बघायला मिळत आहे. अनेक ठिकाणी आंदोलन केली जात आहेत. आता या आंदोलनाने आता उग्र रुप धारण केले आहे.

यामुळे राष्ट्रपती गोयबाया राजपक्षे यांना निवासस्थान सोडून पलायन करण्याची वेळ आली. नागरिकांनी त्यांच्या घराचा ताबा घेतला. यामुळे आंदोलक मोठा संख्येने उपस्थित होते. मे महिन्यात देखील राजपक्षे यांचे लहान भाऊ माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेरही आंदोलकांनी घेराव घातला होता.

त्यावेळी राजपक्षे कुटुंबीयांनी पळ काढत नेव्हल छावणी गाठली होती. त्यांच्यामुळे देशाचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यामुळेच ही वेळ आल्याचे आंदोलन नागरिक सांगत आहेत. राजपक्षे परिवाराने 42 हजार कोटी रुपये देशातून बाहेर नेले, असाही आरोप करण्यात येत आहे.

महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशच्या राजकारणात खळबळ! जगनमोहन रेड्डींच्या आई विजयलक्ष्मींचा मुलाच्या पक्षाला रामराम

श्रीलंकाच्या सरकारमध्ये राजपक्षे कुटुंबातील अनेकजण सहभागी आहेत. यामध्ये राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे, पंतप्रधान महिंदा राजपक्षे, अर्थमंत्री बासिल राजपक्षे, जलसिंचन मंत्री चामल राजपक्षे आणि क्रीडा मंत्री नामल राजपक्षे अशी या पाच जणांची नावे आहेत. त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप देखील आहेत. अनेकांनी आता राजीनामे दिले आहेत. एकेकाळी श्रीलंकेच्या राष्ट्रीय बजेटपैकी 70 टक्के वाट्यावर राजपक्षे भावांचा अधिकार होता.

शेतकऱ्यांनो काळजी घ्या, आता बनावट कीटकनाशके बाजारात, अशी करा खात्री...

त्यानंतर अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. यात यात महिंदा राजपक्षे यांचे नीकटवर्तीय अजित निवार्ड कबराल यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यावेळी ते सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेचे गव्हर्नर होते. यामुळे आता येणाऱ्या काळात देशाची वाटचाल कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा! शेतकऱ्यांना मोठा दिलासा..
अशी शेती केली तर शेतकऱ्यांची पण लग्न होतील!! पट्ठ्याने बँक मॅनेजरच्या नोकरी सोडून केली शेती, आज लाखो कमवतात
बकरी ईद निमित्त ताजमहलमध्ये जाणारांसाठी आनंदाची बातमी, प्रशासनाचा निर्णय..

English Summary: Big eruption SriLanka, President Rajapaksa fled the Rashtrapati Bhavan
Published on: 10 July 2022, 02:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)