News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना महाराष्ट्रातील जनतेला लवकरच पेट्रोल डिझेलवर दिलासा देणार असल्याची घोषणा केली. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात करून जनतेला दिलासा दिला.

Updated on 04 July, 2022 7:21 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. अखेर आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आज त्यांनी बहुमताचा ठराव देखील जिंकला. यामुळे आता राज्यात शिंदे सरकार आले असल्याचे स्पष्ठ झाले आहे. असे असताना आता शिंदे सरकारने पहिल्याच दिवशी एक मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना महाराष्ट्रातील जनतेला लवकरच पेट्रोल डिझेलवर दिलासा देणार असल्याची घोषणा केली. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी मोदी सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात करून जनतेला दिलासा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीने देखील किमती कमी केल्या होत्या. दरम्यान, आता महाराष्ट्रातील सरकारनं पेट्रोल डिझेलवर लवकरच कर कपात करणार असल्याची माहिती दिली.

लवकरच यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असून राज्यातील जनतेला दिलासा देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. यामुळे केंद्र सरकार एवढ्या दिवस जशी टीका राज्य सरकारवर करत होते, तेवढीच टीका आता या सरकारवर होणार का असे विचारले जात आहे.

मोदी सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 5 टक्क्यांनी वाढवले, सोन्याच्या किमती वाढणार...

दरम्यान, ठाकरे सरकारने आम्हाला जीएसटी परतावा दिलेला नाही, यामुळे पेट्रोल, डिझेलवरील कर कमी होणार नाही, अशा शब्दांत अनेकदा कर कपात फेटाळली होती. अजित पवारांनी याबाबत अनेकदा स्पष्टीकरण दिले होते. नरेंद्र मोदींना राज्यांनाही कर कपात करण्याचे आवाहन केले होते. याबाबत अनेक राज्यांनी देखील दर कमी केले होते.

जाता जाता महाविकास आघाडी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, शेतकरी खुश..

आता मोदींच्या विचारांचे सरकार आले आहे, यामुळे दर कमी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकदा मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर ठाकरेंनी त्यास आपला नकार का, हे सांगितले होते. तसेच केंद्राच्या दर कपातीवर राज्याचा जो कर कमी झाला तीच आपली दरकपात असल्याचे भासविले होते.

महत्वाच्या बातम्या;
वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत त्यांनी 14 तलाव खोदले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले कौतुक..
रिकाम्या पोटी नारळपाणी पिल्याने शरीरावर होतात हे परिणाम, जाणून घ्या, होईल फायदा...
भारीच! आता तुमची Activa इलेक्ट्रिक करा, एका वेळेस १०० किमी चालणार...

English Summary: Big decision of Shinde government! Soon petrol and diesel will be cheaper in the state.
Published on: 04 July 2022, 07:21 IST