September: आजपासून सप्टेंबर (September) महिना सुरू झाला असून पहिल्या तारखेपासून अनेक बदल लागू करण्यात आले आहेत. काही बदल शेतकऱ्यांपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणार आहेत. 1 सप्टेंबरपासून 'कही खुशी कही गम' असे वातावरण पहायला मिळणार आहे.
१. घरगुती गॅसेच्या किंमती
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पेट्रोलियम कंपन्या (Petroleum companies) घरगुती गॅसच्या किंमतीत बदल करतात. सरकारने जवळपास 100 रुपयांनी किंमतीत कपात केली आहे. इंडेनच्या 19 किलो व्यावसायिक सिलिंडर (cylinder) किंमतीत दिल्लीत 91.50 रुपये, कोलकत्त्यात 100 रुपये, मुंबईत 92.50 रुपये, चेन्नईत 96 रुपयांची कपात करण्यात आली आहे. (Delhi Kolkata Mumbai Chennai)
आनंदाची बातमी: शेततळे बांधण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत मिळणार अनुदान
२. पीएम किसान योजना
प्रधानमंत्री किसान योजनेत निधी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2022 निश्चित केली होती. जर 31 ऑगस्टपर्यंत या अटीची पूर्तता केली नसेल तर शेतकऱ्यांचा पुढील हप्ता मिळणार नाही.
३. विमा एजंटचे कमीशन कमी
IRDAI ने जनरल इन्शुरन्समधील नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार, एजंटच्या कमीशनमध्ये कपात करण्यात आली आहे. आता 30 ते 35 टक्क्यांऐवजी एजंटला 20 टक्के कमिशन मिळणार आहे. परिणामी ग्राहकांना आता विमा स्वस्त मिळेल आणि या व्यवसायाची व्याप्ती ही वाढेल.
झुकेगा नहीं साला..! कापसाला मिळाला 16 हजाराचा उच्चांकी भाव
४. PNB KYC Updates
पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांसाठी केवायसी (Know Your Customers) अद्ययावत करण्याचे आवाहन केले आहे. बँकेने यासंबंधीचे कडक धोरण यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार, ग्राहकांना पुरेसा अवधी देण्यात आला आहे. 31 ऑगस्टपूर्वी ग्राहकांनी त्यांचे केवायसी अपडेट करणे आवश्यक आहे.
गाई म्हशी असलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दीड लाख रुपये, वाचा काय आहे योजना
Published on: 01 September 2022, 12:13 IST