News

जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील 'समृद्धी' साखर कारखान्याने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे या कारखान्याचे कौतुक केले जात आहे. शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला साखर कारखान्याकडून एक क्विंटल साखर फुकट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

Updated on 23 September, 2022 3:02 PM IST

जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील 'समृद्धी' साखर कारखान्याने एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे या कारखान्याचे कौतुक केले जात आहे. शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नाला साखर कारखान्याकडून एक क्विंटल साखर फुकट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सुरु केल्या या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी आता 100 किलो साखर घरपोच मिळणार आहे. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांच्यामध्ये समाधानाचे आहे. याबाबत कारखान्याचे संचालक सतीश घाटगे म्हणाले, आम्ही सुद्धा शेतकऱ्यांचे काही देणं लागतो, याच भावनेतून कारखान्याने हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हा महत्वपूर्ण निर्णय समृद्धी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये 100 किलो देण्यात येणारी साखर ही शेतकऱ्यांच्या घरी पोहोच करण्यात येणार आहे. तसेच बाकीच्या ऊस उत्पादक सभासदांना 50 किलो साखर घरपोच देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे.

माळेगावला गावे जोडण्यास सभासदांचा विरोध, शेतकरी न्यायालयात जाणार

दरम्यान, येत्या 15 ऑक्टोबरपासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरु होणार आहे. या हंगामात २०० पेक्षा जास्त सहकारी आणि खासगी साखर कारखाने सुरु होणार आहेत. मागील वर्षीपेक्षा यावर्षी ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळं 138 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लवकर कारखाने लवकर सुरु करून अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सरकारने सांगितले आहे.

दुधाचे दर पुन्हा वाढणार, मदर डेअरी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याची शक्यता

मागील वर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यामुळे आता यंत्रणा कामाला लागली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना अजूनही एफआरपी मिळालेली नाही, यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकरी संघटना याबाबत आक्रमक भूमिका घेणार आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना कृषी मंत्रालयाकडून ट्रॅक्टर, कुलींग व्हॅन, अर्थमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Sale Land: शेत जमीन खरेदी- विक्रीमध्ये अमूलाग्र बदल, शेतकरी चिंतामुक्त...
Cotton Rate: शेतकऱ्यांना दिलासा! यंदा देखील कापूस तेजीतच राहणार, मिळणार 'इतका' भाव

English Summary: big announcement sugar factory, one quintal sugar free marriage farmer's daughter
Published on: 23 September 2022, 02:59 IST