गेल्या काही वर्षांपासून बंद असलेला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना (bhima-patas-sugar factory) येत्या महिनाभरात सुरू होणार आहे. यामुळे सध्या समाधान व्यक्त केले जात आहे.
हा कारखाना कर्नाटकातील निराणी ग्रुपने चालवायला घेतला आहे. ग्रुपचे संचालक संगमेश निराणी, कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी आज कारखान्याला भेट देऊन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव शितोळे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
आता कामगारांना देखील कामावर बोलवण्यात आले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना बाहेर ऊस द्यावा लागणार नाही. मध्यरात्री कारखान्याच्या भोंग्याची चाचणी घेण्यात आली. भोंग्याचा आवाज उपस्थित कामगारांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे.
'बदलत्या वातावरण आणि तंत्रज्ञानाशी तरुणांना जोडण्यासाठी लघु उद्योग भारती कार्यरत'
अनेक दिवसांपासून बंद असलेला आवाज ऐकू आल्यावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. एक ते दीड महिन्यात कारखाना सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखाना सुरू होत आहे याचा आनंद आहे. कामगार आणि सभासदांचे प्रश्न सोडविले जातील, असे यावेळी राहुल कुल यांनी सांगितले आहे.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा ऊसदर जाहीर
तसेच विरोधकांना उत्तर देताना ते म्हणाले, कारखाना सभासदांच्याच मालकीचा राहणार आहे. सभासदांच्या उसाचे गाळप करून उसाला योग्य दर दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या;
कोल्हापूरमध्ये भारतातील सर्वात मोठे अंडे! कोंबडीने घातले 210 ग्रॅम वजनाचे अंडे..
सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही- कृषीमंत्र्यांची माहिती
माळेगाव कारखान्याला १० गावे जोडण्याच्या निर्णयाला प्रादेशिक सहसंचालकांची स्थगिती, संचालक मंडळाला मोठा धक्का
Published on: 21 October 2022, 09:51 IST