नुकतेच मोदी सरकारने तूर आयातीला मुदतवाढ दिली मोदी सरकारच्या या निर्णयामुळे तूर उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडू शकतो. खरीप हंगामात सरकारने सोयाबीन बाबतदेखील असाच निर्णय घेतला होता. खरीप हंगामात केंद्र सरकारने सोयापेंड आयातीला परवानगी दिली होती त्यामुळे खरिपात सोयाबीनचे भाव कमालीचे खाली पडले होते.
आता तुरीचे भाव पाडण्यासाठी देखील सरकारचा हा निर्णय मोठा रोल प्ले करू शकतो. खरीप हंगामात सोयाबीन आयातीचा मुद्दा वगळता केंद्र सरकारने कोणताच हस्तक्षेप केला नव्हता त्यामुळे सोयाबीन हरभरा कापूस तूर या शेतमालाला अपेक्षित असा बाजारभाव प्राप्त होत होता.
आता तुरीची आयात करण्याची मुदत संपल्यानंतर मोदी सरकारने तूर आयातीला पुढील एका वर्षाची मुदतवाढ दिल्याने देशांतर्गत तुरीच्या बाजार भावात घट होऊ शकते. शेतकर्यांना तूर आयातीची मुदत संपल्यानंतर दरवाढीची आशा होती मात्र मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
आता संपूर्ण वर्षभर म्यानमार, बर्मा, मालावी, केनिया तुरीची आयात होणार असल्याने देशांतर्गत तुरीच्या बाजारभावात मोठी घसरण बघायला मिळणार आहे. एकंदरीत तूर आयातीची मुदत संपल्यानंतर तूर उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार होता मात्र, मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांचे मरण अटळ ठरत आहे.
तुरीच्या उत्पादनात घट झाल्यामुळे हळूहळू का होईना तुरीच्या बाजार भावात वाढ बघायला मिळत होती. सध्या तुरीला देशांतर्गत बाजारपेठेत हमी भावापेक्षा अधिक दर मिळत आहे. मात्र आता तुरीची आयात वर्षभर कायम राहणार असल्याने तुरीच्या दरात मोठी घट होणार असल्याचा विशेषज्ञांचा अंदाज आहे.
व्यापाऱ्यांच्या मते या निर्णयामुळे तुरीच्या बाजारभावात घसरण झाली नाही तरी तुरीचे दर वाढणार नाही एवढे नक्की. ज्या पद्धतीने कापसाच्या उत्पादनात घट झाल्यानंतर कापसाच्या बाजार भावात मोठी वाढ झाली होती अगदी तशीच वाढ तुरीच्या बाजारभावात होणार होती मात्र आता मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे तुरीच्या बाजार भावाला ब्रेक लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तुरीला विक्रमी बाजार भाव मिळेल या आशेने अनेक तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक करून ठेवली होती. मात्र, तुरीच्या दरात वाढ होण्यापूर्वीच मोदी सरकारच्या या निर्णयाने तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. गेल्या वर्षभरापासून तुरीच्या आयातीला मंजुरी असल्याने देशभरात तुरीचा साठा मोठा वाढला आहे. यंदा तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना आशा होती की तुरीचे दर कापसा प्रमाणे गगनभरारी घेतील. मात्र आता तूर आयातीसाठी मुक्त धोरण अंगीकारल्याने निदान पुढील एक वर्ष तरी तुरीचे दर असेच राहतील असा अंदाज आहे.
संबंधित बातम्या:-
Lasalgaon Apmc: बाजार समितीत शेतकऱ्याचे ट्रॅक्टर गेलं चोरीला; शेतकऱ्यांनी बाजार समिती केली बंद
शेतकरी मोठ्या संकटात!! अचानक द्राक्ष खरेदी बंद, काय झालं असं, जाणुन घ्या याविषयी
शेतकरी मित्रांनो, काजु लागवड कसं आपल्याला लखपती बनवू शकत, वाचा याविषयी…..
Published on: 30 March 2022, 02:40 IST