News

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते त्यांच्यावर चौकशीची मागणी करत आहेत. असे असताना करमाळा जि. सोलापूर येथील श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी स्वतः तब्बल ९ कोटी रूपये भरले आहेत.

Updated on 29 August, 2022 11:40 AM IST

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. भाजप नेते त्यांच्यावर चौकशीची मागणी करत आहेत. असे असताना करमाळा जि. सोलापूर येथील श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी स्वतः तब्बल ९ कोटी रूपये भरले आहेत.

हा रोहित पवारांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. याचे कारण म्हणजे आदिनाथ कारखाना आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांपासून हा विषय सुरू होता. तसेच याबाबत चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, एनसीडीसीचे 25 कोटी कर्ज कारखान्यावर आहे, हे आम्हाला माहिती नाही, असे बारामती ॲग्रो सांगत आली. असे असताना मात्र बारामती ॲग्रोला कारखाना देण्यास सत्ताधारी मंडळी बागल गट, आदिनाथ बचाव यांनी विरोध करण्यास सुरुवात केली.

ठाकरेंनी डावलले आता शिंदे देणार बळ! सेनेच्या वाघाची होणार सभागृहात एन्ट्री

आता सावंत यांनी हे पैसे भरल्यानेच कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू करण्याची संधी तालुक्याला मिळाली आहे. आदिनाथ कारखाना सहकारीच राहिला पाहिजे, राज्यात सत्तापरिवर्तन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला.

दरम्यान, चालू हंगामात कारखाना सुरू करून पाच लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्यांबाबत बागल व आम्ही एकत्र काम करण्याच्या सूचना सावंत यांनी आम्हाला केली आहे, त्याप्रमाणे भविष्यात कारखान्याचे कामकाज केले जाणार आहे.

आमदारांच्यात धक्काबुक्की सुरु होताच नितेश राणेंनी काढला पळ? व्हिडिओ व्हायरल..

असे असताना आदिनाथ कारखाना हा बारामती ॲग्रोलाच चालवायला मिळाला पाहिजे, यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. याबाबत २६ ऑगस्टला सुनावणी झाली. आता १९ सप्टेंबर ही पुढची तारीख देण्यात आली आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:
आर्थिक नियोजन करावं ते दादांनीच! कोरोनात अजित पवारांचे अचूक नियोजन, कॅगकडून कौतुक
ब्रेकिंग! आता दिल्लीत सत्तांतर? केजरीवालांच्या बैठकीला आमदार गायब, मोठी राजकीय घडामोडीची शक्यता..
एकापाठोपाठ एक असे चार कारखाने घेतले, कारवाईने राज्यात खळबळ

English Summary: Baramati Agro's problems likely increase, Tanaji Sawant paid 9 crore factory
Published on: 29 August 2022, 11:40 IST