News

सध्या उस हंगाम सुरू असून कारखाने उसाच्या गळपाची स्पर्धा करत आहेत. पश्चिम महाराष्ट्राला उसाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यातच पुणे जिल्ह्यात गाळपाने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात 15 साखर कारखान्यांकडून 18 लाख 37 हजार 931 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.

Updated on 16 November, 2022 12:18 PM IST

सध्या उस हंगाम सुरू असून कारखाने उसाच्या गळपाची स्पर्धा करत आहेत. पश्चिम महाराष्ट्राला उसाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. यातच पुणे जिल्ह्यात गाळपाने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात 15 साखर कारखान्यांकडून 18 लाख 37 हजार 931 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.

यामध्ये 8.17 टक्के सरासरी उतार्‍यानुसार जिल्ह्यात 15 लाख 1 हजार 660 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कारखाने वेळेत बंद करण्याचे धोरण आखण्यात आले आहे.

गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक राहिला होता. दरम्यान, ऊस गाळप आणि साखर उत्पादनात बारामती अ‍ॅग्रो तर साखर उतार्‍यात श्री विघ्नहर कारखान्याने आघाडी घेतली आहे. कारखान्यांनी जोरदार यंत्रणा राबवली आहे.

राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्षाला रामराम, निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा धक्का

पुणे जिल्ह्यात 9 सहकारी आणि 6 खासगी मिळून 15 साखर कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू झाले आहे. यामुळे हा आकडा मोठा असला तरी गुऱ्हाळांची संख्या देखील मोठी आहे. बारामती अ‍ॅग्रो या खासगी कारखान्याने ऊस गाळप आणि साखर उत्पादनात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे.

या कारखान्याने सर्वाधिक म्हणजे 3 लाख 24 हजार 630 टनाइतके गाळप पूर्ण केले आहे. 6.97 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 2 लाख 26 हजार 300 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. याबाबत पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी माहिती दिली आहे.

पालकांनो लहान मुलांच्या हातात मोबाईल देत असाल तर ही बातमी वाचाच..

विघ्नहर सहकारीने आत्तापर्यंत 1 लाख 33 हजार 90 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. 9.93 टक्के उतार्‍यावर गाळप झाले आहे. विघ्नहरचा साखर उतारा सर्वाधिक आहे. तसेच श्री सोमेश्वर सहकारीचा साखर उतारा 9.73 टक्क्यांइतका मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
LIC Jeevan Shiromani: 4 वर्षांच्या गुंतवणुकीत 1 कोटीपर्यंतचा फॅट फंड, जाणून घ्या सविस्तर..
देशातील गव्हाचा साठा आला निम्म्यावर, दर वाढण्याची शक्यता..
टोमॅटोचे दर घसरले, खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत

English Summary: Baramati Agro tops sugarcane silage, completes 18 lakh metric tonnes
Published on: 16 November 2022, 12:18 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)