बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक अनोखी भेट पाठवली असून त्यांनी तब्बल एक मेट्रिक टन आम्रपाली जातीचे आंबे पाठवले आहेत.
यासंबंधीची माहिती बांगलादेश उच्चायुक्त यांनी दिली असून या वृत्तानुसार, या आधीची आंबा- हिल्सा डिप्लोमसीची परंपरा कायम ठेवत शेख हसीना यांनी ही भेट पाठवली आहे.
2021 मध्ये कोरोना महामारी च्या वेळेस भारताने बांगलादेशाला कोरोनावरील औषधे पाठवली होती त्यानंतर हसीना यांनी भारताचा उल्लेख चांगला शेजारी म्हणून केला होता.
बांगलादेशच्या पंतप्रधानांनी मागच्या वर्षी देखील मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांना तसेच त्रिपुरा,पश्चिम बंगाल व आसाम चे मुख्यमंत्री यांना देखील भेट म्हणून दोन हजार 600 किलो आंबे पाठवले होते.
आंबे बांगलादेशातील रंगपूर जिल्ह्यातील हरिभंगा जातीचे होते.असा आपण विचार केला तर आशिया खंडातील राजकारणाचा एक महत्वाचा भाग म्हणून मॅंगो डिप्लोमसीकडे पाहिले जाते.
एकेकाळी पाकिस्तानकडून भारताला भेट म्हणून आंबे पाठवले जायचे. पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या सहभागाने आणि त्याने भारताला भेट म्हणून आंबे पाठवले होते.
नक्की वाचा:शेतकरी दादांनो : आंबा लागवडीसाठी या 'टीप्स' वापरा, होईल फायदा अन मिळेल भरघोस उत्पादन
आम्रपाली आंब्याची विशेषता
जर आपण आम्रपाली आंब्याचा विचार केला तर आम्रपाली आंब्याची लागवड 1971 पासून केली जाते आणी यामध्ये महत्त्वाचे म्हणजे बांगलादेश याच वर्षी पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला होता.
त्यावेळी डॉ.पियुष कांती मुजुमदार यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थेत हा आंबा दशहरी आणि नीलमचा संकर म्हणून विकसित केला होता.1971 पासून आम्रपाली आंब्याची लागवड सर्वत्र केली जाते.
नक्की वाचा:फलोत्पादन विशेष: शहाबादी आंब्याला विदेशी पसंत,आमिर खानची आहे 200 बिघा आंब्याची बाग
Published on: 19 June 2022, 09:38 IST